सध्या राज्यात सुरू असलेल्या विषयांवर पक्षाची भूमिका काय आहे? हे त्यांनीही मांडायला हवे. त्यांना हे सर्व मान्य आहे का? त्यांची आरक्षणासंदर्भात काय भूमिका आहे? त्यांनी इतिहासात जे काही मांडलं आहे, तसंच मांडलं, तर स्वागतच होईल. जे पूर्वी मांडलंय त्यापेक्षा वेगळं काही मांडलं तर नक्कीच लोक रिअॅक्ट करतील. त्यामुळे त्यांचे सर्वांचे मांडणे अत्यंत महत्वाचे आहे. शरद पवार हे सर्वाधिक अनुभव असेलले नेते आहेत. त्यामुळे यासंदर्भातील त्यांची भूमिका काय? असा सवाल करत, याबद्दल महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे, असे विधानपरिषदेतील भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. त्या छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांसोबत बोलत होत्या.
विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर, पंकजा आज पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरवरून बीडला जात आहेत. दरम्यान, त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल रामा येथे पत्रकारांसोबत संवाद साधला.
मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भातील प्रश्नावर काय म्हण्याल्या पंकजा -यावेळी, मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की, 288 पाडायचे अथवा 288 उभे करायचे, जरांगे पाटील आता राजकारणाकडे वळताना दिसत आहेत, याकडे आपण कसे बघता? असे विचारले असता, पंकजा म्हणाल्या, “मी काही बघत नाही. जोवर कोणतीही व्यक्ती, ते एकटचे नाही, जे बोलतात ते करतात, तोवर बोलण्यात काही अर्थ नाही. नुसते बोलून उपयोग नाही. ते करून दाखवायाला हवे कुणीही. मही एखादी मोठी घोषणा करेन, पार दंड थोपटून बोलीन, पण मी प्रत्यक्षात करायला हवे. त्यामुळे, कोणीही बोललं, तरी ते प्रत्यक्षात काय करतात? याकडे माझेही उत्सुक्तेने लक्ष्य आहे,” असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
वंचितांना समोर ठेऊनच राजकारण करेल -आता आमदार झाल्यानंतर बीडसाठी तुम्ही काय ध्येय निश्चित केले आहे? असे विचारले असता पंकजा म्हणाल्या. “जेव्हा माझ्याकडे शक्ती होती, सत्ता होती, तेव्हा मी फार ऐतिहासिक काम करू शकले, हे माझे भाग्य आहे. जशी माझी संवेधानिक शक्ती आहे त्या प्रमाणे मी 100 टक्के, बीड जिल्हा ही माझी मातृभूमी आणि कर्मभूमी आहे. महाराष्ट्रातील लोकही माझ्यावर काही कमी प्रेम करत नाहीत. विधान परिषद सदस्य म्हणजे संपूर्ण राज्याचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे राज्यातील वंचितांसाठी योग्य आणि स्ट्राँग भूमिका घेताना मी अजिबात मागेपुडे बघणार नाही. वंचितांना समोर ठेऊनच राजकारण करेल. मुळात संस्कार अंत्योदयाचे असल्याने, अंतिम माणसाचा उदय होणे, हे राजकारणात आवश्यक आहे, त्यासाठी काम करेन," असेही पंकजा म्हणाल्या.