शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

पंकजा मुंडे यांचे वक्तव्य अनाठायी

By admin | Published: April 20, 2016 1:01 AM

दारू कारखान्यांना होणारा पाणी पुरवठा हा उद्योगासाठी आरक्षित पाण्यातून होत आहे, तो बंद करणे चुकीचे आहे, असे पंकजा मुंडे यांचे वक्तव्य अनाठायी असल्याचे मत

पुणे : दारू कारखान्यांना होणारा पाणी पुरवठा हा उद्योगासाठी आरक्षित पाण्यातून होत आहे, तो बंद करणे चुकीचे आहे, असे पंकजा मुंडे यांचे वक्तव्य अनाठायी असल्याचे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले़ मराठवाड्यात दुष्काळ असताना औरंगाबाद येथील दारू कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी केली जात आहे़ त्यावर असा पाणीपुरवठा बंद करणे चुकीचे असल्याचे जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले होते़ सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप होत असल्याचे विचारले असता गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘सरकार ही सामूहिक काम असून, मुख्यमंत्री त्याचे नेतृत्व करतात़ आम्हाला जबाबदारीचे भान आहे़ पाणी नियोजन, रोजगार हमी योजना, मजुरांना काम याच्या अंमलबजावणीत कमी पडतो़ काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही जण सरकारला निशाणा करीत आहेत़ त्यावर सर्व पक्षीय समित्या नेमून अंमलबजावणी अधिक गतीने करता येईल़ या विषयावर पंकजा मुंडे यांच्याशी आमचे मतभेद आहेत़ स्वतंत्र विदर्भाबाबत त्या म्हणाल्या, विदर्भात १०६ आमदार तसेच मुख्यमंत्र्यासह अनेक पदे मिळूनही विकास झाला नाही़ आम्हाला १० वर्षे संधी दिली असती तर विकास करून दाखविला असता, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली होती़ १५ वर्षांत अनेक सिंचन प्रकल्प रखडले़, २०१२ ला पूर्ण होणारे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत, त्यामुळे अनुशेष वाढला़ महाराष्ट्र अखंड राहावा, अशी आमची भूमिका आहे़ छोट्या राज्याची भूमिका मांडणाऱ्यांनी गुजरात छोटा करून दाखवावा़ काही जणांचे हितसंबंध त्यात गुंतले आहेत़ त्यांना विकासातला मोठा भागीदार पुसून टाकायचा आहे, असे त्यांनी सांगितले़ विधिमंडळ अधिवेशनात आपण महाराष्ट्र अखंड व संयुक्त असावा, यासाठी विधान परिषद नियमानुसारचा २३ब ऐतिहासिक प्रस्ताव सादर करून शिवसेनेने मराठी जनतेशी आपली इमानदारी स्पष्ट केली़ हा प्रस्ताव आता पुढील अधिवेशनात येणार आहे़ या अधिवेशनात पुणे शहराच्या वाहतूक, कचरा, पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, वीज ग्राहकांची फसवणूक, मुद्दाम उशिरा बिले देऊन केली जाते, त्याबद्दल कंत्राटदारांवर कारवाई, मुलांच्या शालेय सहलींबाबत घेण्याच्या दक्षताबाबत विधायक सूचना शासनाने स्वीकारावी, या मुद्द्यांवर प्रश्न, लक्षवेधीद्वारे आवाज उठवला़ पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाचे काम वीज, फर्निचरअभावी रखडले होते़ त्यासाठी आर्थिक तरतूद करून यासाठी पाऊले उचलणार असल्याचे ठोस आश्वासन विधी व न्याय विभागाने सभागृहात दिल्याचे डॉ़ गोऱ्हे यांनी सांगितले़