कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात संशयित असलेले फरार आरोपी सनातन संस्थेचे साधक विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. क-हाड, जि. सातारा) व सारंग दिलीप अकोळकर (रा. चिंतामणी अपार्टमेंट, पुणे) यांच्याबाबत खात्रीशीर माहिती देणा-यास राज्य शासनाच्यावतीने १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व तपासी अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.पानसरे हत्याप्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फरार पवार आणि अकोळकर यांना अटक करण्यासाठी सत्र न्यायालयात १३ जुलै रोजी सीआरपीसी ७३ प्रमाणे अजामीनपात्र वॉरंट प्राप्त करून घेण्यात आले. त्यानंतर माहिती देणाºयास १० लाखांचे बक्षीस देण्याचा प्रस्ताव महाराष्टÑ शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार राज्य शासनाच्या गृह विभागाकडून हे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.‘तपास भरकटलेला’पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांचा तपास भरकटलेलाच आहे. पानसरे यांच्या मारेकºयांची नव्हे, तर ‘सनातन’च्या साधकांची माहिती देणाºयांना बक्षीस जाहीर करणे हा पोलिसांचा पूर्वग्रहदूषितपणा असल्याचा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी पत्रकाद्वारे केला आहे. सारंग अकोळकर आणि विनय पवार यांच्या नावे १० लाखांचे बक्षीस जाहीर करून कोल्हापूर पोलिसांनी स्वत:च्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे, असाही आरोप पत्रकात करण्यात आला आहे.या फोननंबरवर संपर्क साधण्याचे आवाहनमहाराष्टÑ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे : ०२०-२५६३४४५९.अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर : ०२३१-२६५६१६३.रमेश ढाणे, पोलीस उपनिरीक्षक, विशेष तपास पथक, कोल्हापूर : ९८२३५०२७७७दाभोलकर हत्याप्रकरणीही ५ लाखांचे बक्षीस -अंधश्रद्धा निमुर्लन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणीही केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)आणि विशेष गुन्हे पथक, मुंबई यांना विनय पवार आणि सारंग अकोळकर हे हवे असून त्यांनीही ५ लाखांचे बक्षीस यापूर्वीच जाहीर केले आहे.
पानसरे हत्या प्रकरण :पवार आणि अकोळकरवर १० लाखांचे बक्षीस, राज्य गृहविभागाची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:45 AM