शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

पानसरे हत्या प्रकरण; मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2017 3:11 PM

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय  पवार या दोघांना पकडून देणाऱ्यांना १० लाख रूपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

ठळक मुद्देकॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय  पवार या दोघांना पकडून देणाऱ्यांना १० लाख रूपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपींना पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करावं, असा प्रस्ताव तपास यंत्रणेने राज्य सरकारकडे पाठवला होता विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचं बक्षीस देण्याचा प्रस्ताव गृहविभागाने बुधवारी संमत केला आहे.

कोल्हापूर, दि. 2- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय  पवार या दोघांना पकडून देणाऱ्यांना १० लाख रूपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपींना पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करावं, असा प्रस्ताव तपास यंत्रणेने राज्य सरकारकडे पाठवला होता. गृहविभागाने हा प्रस्ताव मंजूर केला असून, फरारी आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचं बक्षीस देण्याचा प्रस्ताव गृहविभागाने बुधवारी संमत केला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्याला राज्य सरकारने १० लाखांचे बक्षीस जाहीर केलं असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे

कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर विनय पवार आणि सारंग आकोलकर या दोघांनी गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. पानसरे यांच्या पत्नी उमा यांनीही या दोघांचे फोटो ओळखले आहेत. याशिवाय एका साक्षीदारानेही पवार आणि अकोलकर पिस्तूल मिळवण्यासाठी बिंदू चौकातील दुकानात आल्याची साक्ष पोलिसांकडे दिली. पोलिसांच्या ताब्यात असलेला समीर गायकवाड याच्याशी या दोघांचाही संपर्क आल्याचे तपासात समोर आलं आहे. मात्र, पानसरे यांची हत्या झाल्यापासून हे दोघीही फरार आहेत. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही बजावण्यात आलं आहे. तरीही ते पोलिसांच्या हाती आलेले नाहीत.त्यामुळे त्यांच्यावर अखेर बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पानसरे यांच्यावर फेब्रुवारी २०१५ मध्ये हल्ला झाला होता. या प्रकरणी सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड आणि विरेंद्र तावडे यांच्यासह विनय पवार आणि सारंग अकोलकर या दोघांवर विशेष तपास यंत्रणेनं दोषारोप दाखल केलं आहे. यापैकी विरेंद्र तावडे दाभोलकर हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे, तर समीर गायकवाडला नुकताच जमीन मंजूर झाला आहे. 

फेब्रुवारी 2015 मध्ये झाली पानसरेंची हत्याकॉम्रेड गोविंद पानसरे त्यांच्या सागरमाळ परिसरातील घरापासून मॉर्निंग वॉकहून परत येताना त्यांच्यासह पत्नी उमा पानसरे यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या चार मारेकऱ्यांनी 16  फेब्रुवारी २०१५ रोजी गोळीबार केला होता. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पानसरे यांचा २० फेब्रुवारीला उपचार सुरु असताना मुंबईतील जे.जे.रुग्णालयात मृत्यू झाला होता. उमा पानसरे यांच्याही डोक्याला गोळी चाटून गेली होती परंतू त्यातून त्या बचावल्या. त्यानंतर विशेष तपास पथकांने ‘सनातन’ संस्थेचा पूर्ण वेळ साधक असलेल्या समीर गायकवाड याला १६ सप्टेंबर २०१५ अटक केली होती. तेव्हा पासून तो पोलिसांच्या ताब्यात होता.