चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : पोट न फाडता शस्त्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त ठरणारे ‘फ्लेक्झिसर्ज’ उपकरण येथील डॉ. सुरेश देशपांडे यांनी विकसित केले आहे. १० मिलिमीटर व्यासाचे मनगट आणि हातासारखे कार्य करणाºया या उपकरणाचे पेटंटही त्यांना मिळाले आहे. सहा महिन्यांत हे उपकरण भारतातीलच नव्हे, तर जगभरातील डॉक्टरांच्या सेवेत दाखल होणार आहे.इंडियन असोसिएशन आॅफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल इंडो सर्जन्सचे माजी अध्यक्ष असलेल्या डॉ. देशपांडे यांनी आतापर्यंत लॅप्रोस्कोपिक सर्जरीसाठी नवी पाच उपकरणे विकसित केली आहेत. ‘फ्लेक्झिसर्ज’ हे त्यांचे सहावे उपकरण आहे. पोटाच्या अवघड किंवा गुंंतागुंतीच्या शस्त्रकिया करताना मोठा छेद करून तेथे टाके घालावे लागतात. त्याचा रुग्णाला त्रास होतो. शिवाय डॉक्टरांनाही जादा श्रम करावे लागतात. हा त्रास कमी करण्यासाठी फ्लेक्झिसर्ज विकसित करण्यात आले आहे. असे डॉ. देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कसे कार्य करते उपकरण?फ्लेक्झिसर्ज हे १० मिलिमीटर व्यासाचे उपकरण आहे. लॅप्रोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करताना पोटाच्या तेवढ्याच भागाला छिद्र पाडून ते आत जाते. आतमध्ये मनगटासारखे सर्व दिशांनी फिरू शकते. पोटात पोकळीत शिरल्यानंतर हातासारखे वाकू शकते. त्याची ब्लेड्स ३६0 अंशात फिरतात. यामुळे कुठल्याही कोपºयातील नको असलेला भाग काढून टाकणे, तेथे टाके घालणे सुलभ होते. हे रोबोटिक उपकरण असल्याने हाताने वापरण्यासारखे आहे, असे डॉ. सुरेश देशपांडे यांनी सांगितले.रोबोटिक आॅपरेशन थिएटरडॉ. देशपांडे यांनी भारतीय बनावटीचे देशातील पहिले रोबोटिक आॅपरेशन थिएटरही तयार केले आहे. ज्यामध्ये या थिएटरमधील शस्त्रक्रियेसाठी लागणारी १५ ते २० उपकरणे एका माणसाच्या (डॉक्टरांच्या) सूचनाबरहुकूम काम करतात. त्या माणसाचा आवाज हीच त्यांच्यासाठी ओळखीची खूण असते. डॉ. देशपांडे यांच्या कोल्हापुरातील रुग्णालयात असे थिएटर कार्यरत आहे. या संशोधनांचे पेटंटही त्यांना मिळाले आहे. त्यांनी ते जर्मनीतील एका कंपनीला अलीकडेच दिले आहे. या कंपनीकडून लवकरच अशी आॅपरेशन थिएटर्स जगभरात उपलब्ध होतील. यामुळे कर्मचाºयांची बचत तर होतेच शिवाय शस्त्रक्रियेत अचुकता येते, असेही डॉ. देशपांडे यांनी सांगितले.
पोटाच्या शस्त्रक्रियांसाठी ‘फ्लेक्झिसर्ज’ उपकरण विकसित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 2:55 AM