शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

पेपर आरसीची कटकट संपणार

By admin | Published: April 17, 2017 11:04 PM

वाहनांचे नोंदणीपुस्तक (आरसी बुक) तब्बल दोन वर्षांपासून पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून दिले जात आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 17 - राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना वाहनांचे नोंदणीपुस्तक (आरसी बुक) तब्बल दोन वर्षांपासून पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून दिले जात आहे. मात्र आता हे लवकरच संपुष्टात येणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने पुन्हा आरसीला स्मार्ट कार्डचे स्वरुप देण्याचा निर्णय घेतला असून रोजमर्टा टेक्नोलॉजीस लि. या कंपनीला हे कंत्राट दिले आहे.परिवहन विभागाने कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बूकला २००६मध्ये स्मार्ट कार्डचे स्वरुप दिले. या कार्डच्या पुरवठ्यासाठी शाँग या खासगी कंपनीशी करार केला होता. जून २०१४ मध्ये कंपीनेच कंत्राट संपले. विभागाने कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. परंतु या दरम्यान नव्या कंपनीला कंत्राट किंवा या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही. परिणामी, डिसेंबर २०१४ पासून नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांना जुन्या स्वरुपातील कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बुक देणे सुरू झाले. विशेष म्हणजे, आरटीओकडे आधीच तोकडे मनुष्यबळ यात या नव्या कामाची भर पडल्याने आणि वेळोवेळी आरसी कागदाचा (प्री प्रिंटर स्टेशनरी) तुटवडा पडत राहिल्याने प्रलंबित आरसीची समस्या वाढली होती. यातच, आरसी बाळगताना कागदापेक्षा स्मार्ट कार्ड सोईस्कर आणि कागदाच्या तुलनेत टिकाऊ असल्याने नागरिकांकडून कागदाच्या आरसीबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पररिवहन विभागाने पुन्हा स्मार्ट आरसी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.-दोन वर्षांसाठी पुरवठादाराची नेमणूकपरिवहन विभागाने आरसीचे स्मार्ट कार्ड बनविण्याचे काम रोजमर्टा टेक्नोलॉजीस लि. कंपनीला दिले असून त्यासंबंधीचा करारही केला आहे. कंपनीला प्रति स्मार्ट कार्डमधून ५४ रुपये ७२ पैसे मिळतील. शिवाय कंपनीला वाहन १.० प्रणालीमधून वाहन ४.० प्रणालीमध्ये डेटा रुपांतरीत करावा लागणार आहे. -पेपर आरसीलाही मिळणार स्मार्ट कार्डगेल्या दोन वर्षांपासून वाहनधारकांना पेपर आरसी दिली जात आहे. मात्र, आता सेवापुरवठादार नेमण्यात आल्याने ज्यांच्याकडे पेपर आरसी आहे आणि त्यांना स्मार्ट कार्ड हवे असेल, तर त्यासाठीचे शुल्क आरटीओकडे भरून त्यांना ते दिले जाणार आहे, अशी माहिती आरटीओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.