मुंबई : सालबादप्रमाणे महापालिकेने या वर्षीही आपला वायदा मोडल्यामुळे गणरायाला मंडपापर्यंत पोहोचण्यासाठी खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागला़ अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीची मूर्ती रविवारीच मंडपात आणली़ मात्र, खड्डे भरण्याची डेडलाइन पाळू न शकलेल्या पालिका प्रशासनाने आणखी चार दिवसांची मुदत वाढवून घेतली आहे़ मात्र, पालिकेच्या या लेट कारभारामुळे गणेशोत्सव मंडळ हवालदिल झाले आहेत़सजावटीनिमित्त बहुतेक गणेशोत्सव मंडळे गणरायाची मूर्ती पंधरवड्याआधीच मंडपात आणतात़ रविवारचा मुहूर्त साधून अनेक मंडळांनी गणपतीची मूर्ती वाजतगाजत मंडपात आणली़ मात्र, ढोल-ताशांबरोबरच खड्ड्यांनीही या वेळी गणपती बाप्पाचे स्वागत केले़ मंडळे २१ आॅगस्टला गणेशमूर्ती आणणार असल्याची पूर्वकल्पना बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पालिकेला दिली होती़त्यानुसार, २१ आॅगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते़ हे आश्वासनही खड्ड्यात गेले असून, आता २६ आॅगस्टपर्यंत खड्डे बुजविण्यात येणार आहेत़ दरम्यान, रविवारी गणेश मंडळांना गणेशमूर्ती निर्विघ्न मंडपापर्यंत नेण्यासाठी खड्ड्यांवर स्टीलचे प्लेट टाकून ट्रॉली पुढे सरकवून आणण्यात आली़, याचा परिणाम वाहतुकीवरही झाला़ (प्रतिनिधी)>खड्ड्यांच्या तक्रारीत गोलमालखड्ड्यांच्या तक्रारी गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचा पालिकेचा दावा फोल ठरला आहे़ गेल्या वर्षीचा आकडा पार करीत खड्ड्यांनी ३७०० पर्यंत मजल मारली आहे़ मात्र, प्रत्यक्षात या वेळीस खड्ड्यांची संख्या लपविण्यासाठी एका रस्त्यावर दहा खड्डे असल्यास तो एकच आकडा गणला जात असल्याचे सूत्रांकडून समजते़ यावरून खड्ड्यांच्या संख्या कैकपटीने अधिक असण्याची शक्यता आहे़
बाप्पाच्या आगमनातही खड्ड्यांचे ‘विघ्न’
By admin | Published: August 23, 2016 1:39 AM