- प्रमोद गवळी, नवी दिल्ली
पश्चिम महाराष्ट्राने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या आड येऊ नये. स्वतंत्र विदर्भासाठी लोक आता रक्त सांडवायलाही तयार आहेत. ही लढाई शेवटची लढाई नसून शेवटपर्यंत चालणारी (विदर्भ राज्य निर्माण होईपर्यंत) लढाई आहे, असे रोखठोक प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी केले.नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात अॅड. अणे बोलत होते. या आंदोलनात विदर्भातून आलेल्या दीड हजारावर कार्यकर्त्यांनी भागघेतला.आपल्या जोशपूर्ण भाषणात अॅड. अणे म्हणाले, ‘ स्वतंत्र राज्यासाठी कायद्यात अगोदरपासूनच तरतूद आहे. आता विदर्भाच्या प्रत्येक लहान-मोठ्या गावांत हे आंदोलन पोहोचविण्याची गरज आहे.’स्वतंत्र मराठवाडा : मराठवाडी जनताच निर्णय घेईलअॅड. अणे म्हणाले, ‘वेगळ्या मराठवाड्याची मागणी का करीत आहात, असा प्रश्न मला विराचला जात आहे. त्यावर माझे म्हणणे असे आहे की, मराठवाड्यासोबत अन्याय होत असेल तर विदर्भ त्याच्या सोबत आहे. स्वतंत्र मराठवाडा पाहिजे असेल तर तेथील लोकच त्याबाबत निर्णय घेतील.’स्व. जवाहरलाल दर्डा यांची प्रशंसा‘लोकमत’ची स्थापना लोकनायक बापुजी अणे यांनी अवश्य केली आहे. परंतु लोकमतला वटवृक्ष बनविण्याचे काम स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांनीच केले आहे. लोकमतला या उत्तुंग शिखरावर त्यांनीच पोहोचविले आहे. लोकमत जेव्हा दर्डाजींकडे सोपविण्यात येत होते तेव्हा विदर्भाच्या लोकांनी ‘मराठी विरुद्ध हिंदी’ असा भाषावाद उभा केला नाही. या विदर्भात अगदी सुरुवातीपासून हिंदी आणि मराठी एकत्र नांदत आल्या आहेत. कधीच कोणता वाद निर्माण झालेला नाही, असे अॅड. अणे म्हणाले.