शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

परांजपे बिल्डर गजाआड

By admin | Published: April 25, 2017 2:30 AM

१८०० सर्वसामान्यांना स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून ४७ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी परांजपे कन्स्ट्र्क्शनच्या जयंत परांजपे यांना गजाआड

वसई : १८०० सर्वसामान्यांना स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून ४७ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी परांजपे कन्स्ट्र्क्शनच्या जयंत परांजपे यांना गजाआड करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. १९८५ मध्ये परांजपे कन्स्ट्र्क्शनने विरारजवळील कोफराड येथे जेपीनगर नावाचा गृहप्रकल्प बांधला. त्यावेळी कोफराडचे तत्कालीन सरपंच मनवेल तुस्कानो यांनी तीव्र विरोध केला होता. या प्रकल्पाविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर, हा प्रकल्प रखडला होता. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली होती. ग्राहकांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर, काही भूखंडाचा लिलाव झाला, तर काही भूखंडावर सरकारने टाच आणली होती. प्रकल्प रखडल्यानंतर आयोनिक इको सिटी संकुलात सात मजल्याच्या ३६ इमारती उभारण्याची जाहिरातबाजी केल्याचा परांजपे यांच्यावर आरोप करण्याता आला होता. या ठिकाणी स्वस्त दरात सदनिका दिल्या जातील, असे आमिष दाखवण्यात आले होते. त्यासाठी ग्राहकांकडून २० टक्के रक्कम आगाऊ घेण्यात आली होती. येथील सदनिकांचा ताबा २०१४ पर्यंत दिला जाईल, असेही आश्वासन बिल्डरने दिले होते. त्याचप्रमाणे, गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या रकमेवर वार्षिक १५ टक्के व्याज देऊन रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते, तसेच १४०० ग्राहकांकडून सुमारे ३८ कोटींच्या ठेवी गोळा केल्या होत्या. यानंतर, हा संपूर्ण प्रकल्प परांजपे यांनी तारीक शौकतअली चुनावाला यांच्याशी करार करून त्यांना विकला होता. प्रत्यक्षात परांजपे आणि चुनावाला यांनी प्रकल्प पूर्ण केला नाही, तसेच गुंतवणुकादारांचे पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे परांजपे यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून परांजपे यांच्याविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, पोलिसांनी जयंत परांजपे यांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)