शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पारस वीज केंद्राची कामगिरी उत्तम

By admin | Published: May 20, 2017 1:53 AM

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन: नवीन वीज प्रकल्पाचे काम सुरू करण्याची आमदार सिरस्कार व स्थानिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपारस : पारसच्या नवीन वीज प्रकल्पासंदर्भात अभ्यास करून आपण १५ दिवसांत निर्णय घेणार आहोत, तसेच सांघिक सामाजिक बांधीलकी अंतर्गत परिसरातील गावांमध्ये वॉटर फिल्टर बसविणे व जलसिंचनासह अन्य कामेदेखील केली जातील, असे सांगून कमीत कमी कोळशात महत्तम वीज उत्पादन, वीज वापरात बचत, पाणी बचत व पुनर्वापर, परिसरात साफसफाई व एकूणच नियोजनपूर्वक कामे केल्याने पारस वीज केंद्राची कामगिरी उत्तम असल्याचे गौरवोद्गार राज्याचे ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १८ मे रोजी पारस वीज केंद्राला दिलेल्या भेटीदरम्यान प्रतिपादन केले. यावेळी बावनकुळे यांनी १८ मे रोजी महानिर्मितीच्या पारस औष्णिक वीज केंद्राचा कोळसा हाताळणी विभाग, राख हाताळणी विभाग, शून्य पाण्याचा निचरा, पीसीआर-३ इत्यादी विभागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व तेथील अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांसमवेत थेट संवाद साधला. त्यानंतर पारस वीज केंद्राच्या कामगिरीबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे त्यांनी सविस्तर आढावा घेतला. विभाग प्रमुखांच्या समस्या जाणून घेऊन मार्गदर्शन केले, तसेच संचालक यांच्या पंचसूत्री कार्यक्रमाची त्यांनी प्रशंसा केली. याप्रसंगी आमदार बळीराम सिरस्कार, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) विनोद बोंदरे, मुख्य अभियंते राजेंद्र बावस्कर, अनंत देवतारे, अधीक्षक अभियंते कन्हैयालाल माटे, रूपेंद्र गोरे, श्रीराम बोडे, सुधाकर पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक कांबळे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे व तहसीलदार बाळापूर, भाजपा अकोला जिल्हा अध्यक्ष तेजराव थोरात प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीनंतर बाळापूर नगर परिषदेच्या वतीने विकासात्मक कामांबाबत निवेदन देण्यात आले, तसेच ग्रामपंचायत कोळसा, पारस, सातरगाव, मनारखेड येथील विविध समस्यांबाबत बावनकुळे यांना अवगत करण्यात आले.या बैठकीत बोलताना आ. बळीराम सिरस्कार म्हणाले, की पारस वीज प्रकल्पासाठी येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. या भागाचा अधिक विकास करण्यासाठी पारस येथे ६६० मेगावॅटचा संच सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पारस येथे ६६० मेगावॉट नवीन वीज प्रकल्प होणारपारस येथे ६६० मेगावॅट क्षमतेचा नवीन वीज प्रकल्प सुरू करण्यासाठी मूलभूत बाबी तपासणे, अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यात जमीन, पाणी, शेगाव, अकोला शहर, खामगाव येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज उत्पादनासाठी वापर, कोळसा लिकेज, वीज उत्पादन खर्च, वीज क्षेत्रातील वाढती स्पर्धा लक्षात घेता मेरिट आॅर्डरमध्ये संच बसेल किंवा नाही, आगामी काळातील विजेची मागणी व पुरवठा यांचा तुलनात्मक अभ्यास करून यावर निर्णय घ्यावा लागणार असल्याचे ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले. तसेच आगामी काळात भुसावळ, नाशिक, पारस, उमरेड या भागात नवीन वीज प्रकल्प सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचे ते म्हणाले.सांघिक सामाजिक बांधीलकी केंद्र अथवा राज्य शासनाच्या योजनांमध्ये समाविष्ट नसलेली कामे, महानिर्मितीच्या सांघिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत करण्यात यावी व त्यासंबंधी आवश्यक संयंत्र खरेदी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. परिसरातील नारखेड, पारस, कोळासा, मांडोली, शेळद, सातरगाव, कुपटा, हिंगणा, बटवाडी या गावांमध्ये १० वॉटर फिल्टर बसविण्याचे निर्देश आपण देणार आहोत. परिसरातील ५० गावांमध्ये शेत रस्ते, नाले, तलाव यांची कामे करून जलसाठा वाढविता येईल, जेणेकरून परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यास हातभार लागेल व पर्यायाने महानिर्मितीची प्रतिमा अधिक उजळ होईल, असेही ते म्हणाले.