शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पारधी समाजातील तरुणाईने घडविले परिवर्तन!

By admin | Published: July 20, 2015 12:39 AM

पारधी समाज म्हटला की गुन्हेगार, दरोडेखोरीचा शिक्का बसलेली आदिवासी जमात. श्रीगोंदा तालुक्यातील पारधी समाजातील काही कुटुंबांनी मात्र कठोर परिश्रम,

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा (अहमदनगर)पारधी समाज म्हटला की गुन्हेगार, दरोडेखोरीचा शिक्का बसलेली आदिवासी जमात. श्रीगोंदा तालुक्यातील पारधी समाजातील काही कुटुंबांनी मात्र कठोर परिश्रम, संघर्ष करीत शेतमळे फुलविले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात सुख, समृद्धीबरोबर शिक्षणाचा नंदादीपही उजळला आहे. पोलिसांचा ससेमिरा थांबला आहे.श्रीगोंदा तालुक्यात पारधी जमातीची ३ हजार ९०० लोकसंख्या असून तालुक्यात सर्वाधिक दरोड्याचे गंभीर गुन्हे घडले. बहुतेक गुन्ह्यांमध्ये पारधी समाजातील गुन्हेगारांना तुरुंगवास भोगावा लागला आहे. गुन्हेगारीच्या सावटाखालील अंधारमय जीवन जगण्यापेक्षा शिक्षण घेऊन शेतीत घाम गाळून जीवनात परिवर्तन करण्यासाठी येथील तरुण पिढीने धडपड सुरू केली आहे.बेलवंडी येथील फुलचंद चव्हाण यांनी टोमॅटो, बरनश्या भोसले यांनी डाळिंबाची बाग, चंद्रकांत काळे यांनी लिंबोणी, लोणीव्यंकनाथ येथील विलास काळे यांनी झेंडू तर शरद काळे यांनी डाळिंबाची बाग फुलविली आहे. विश्रांत काळे (आढळगाव), सखाराम चव्हाण (ढोरजा), संगीता चव्हाण (वडाळी), सुमन चव्हाण (सुरोडी), बक्कट काळे (बेलवंडी कोठार), सुरेखा भोसले (घारगाव) यांनी ऊस, कांदा, गहू, ज्वारीसारखी पिके घेऊन शेतीत बस्तान बसविले आहे. बहुतेक तरूण शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, मल्चिंग पेपरसारखे नवे तंत्रज्ञान स्वीकारले. काहींनी मेंढीपालनचा सक्षम मार्ग निवडला आहे. किरण काळे हे जिल्हा सहकारी बँकेत विसापूर शाखेचे व्यवस्थापक आहेत. लोणीचे संतोष भोसले बी. एस्सी. (अ‍ॅग्री), छाया भोसले (सिव्हील इंजिनिअर), गोपीचंद काळे (हॉटेल मॅनेजमेंट), प्रमोद काळे (एम. ए.) उच्चशिक्षित झाले असून शाळेतही पारधी समाजातील विद्यार्थ्यांचा आवाज घुमत आहे.