शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

भाववाढीच्या दप्तराचे ओझे पालकांच्या खांद्यावर

By admin | Published: June 13, 2016 3:13 AM

शैक्षणिक फीवाढीमुळे आधीच हैराण झालेल्या पालकांना नव्या शैक्षणिक वर्षात शालेय खर्चाचे बजेट सांभाळताना नाकीनऊ येणार आहे.

दत्ता म्हात्रे,

पेण- राज्यभरातील शाळांच्या शैक्षणिक फीवाढीमुळे आधीच हैराण झालेल्या पालकांना नव्या शैक्षणिक वर्षात शालेय खर्चाचे बजेट सांभाळताना नाकीनऊ येणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यास दोन दिवस बाकी असतानाच गतवर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याच्या किमतीत वाढ झाली असून या खरेदीचे बजेट सांभाळण्यासाठी पालकांची बेरीज- वजाबाकी सुरू झाली आहे. गणवेश १० टक्क्यांनी महागले असून महागाईचा निर्देशांक सतत चढत आहे.वाहतुकीचे वाढलेले दर आणि मजुरांची संख्या घटल्याने कपडा व शिलाईमुळे गणवेश महागल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. यावर आकारण्यात आलेल्या वेगवेगळ्या करांचा भार आणि वीज दरवाढीमुळे गणवेशाची किंमत वाढविण्यात आली आहे. गतवर्षी ज्या गणवेशासाठी ५०० रुपये खर्च येत होता त्यासाठी आता ५५० ते ८०० रुपये मोजावे लागणार आहेत. अनेक शाळा आणि दुकानदारांचे संगनमत असल्याने पालकांना ठरावीक दुकानदारांकडून गणवेश खरेदी सक्ती केली जात असल्याने त्यांचा भुर्दंडही पालकांना सहन करावा लागत आहे. शालेय शैक्षणिक साहित्यातही भाववाढ झाल्याचे चित्र दिसत असून कंपास बॉक्स, प्रयोग साहित्य, प्रयोगवह्या यांच्या किमती १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. वॉटर बॉटल, लंच बॉक्स यांच्याही किमती वाढल्या आहेत. ज्या वॉटर बॉटल १५ ते ७५ रुपयांना मिळत होत्या त्यासाठी आता २० ते १०० रुपये आकारण्यात येत आहेत. छोट्या विद्यार्थ्यांसह माध्यमिक व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना खास शैलीतील लंच बॉक्स हवे असतात. या आवडीच्या मागणीसाठी आता जादा ५० ते १०० रुपये खर्च करावे लागत आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या सहाव्या इयत्तेच्या पुस्तकाची छपाई नव्याने करण्यात आल्याने परिणामी पुस्तकाच्या किमती तिपटीने वाढल्या आहेत. १५ रुपयांना उपलब्ध असलेले पाठ्यपुस्तक यंदा ३३ ते ४५ रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. वह्यांच्या डझनाच्या दरात दोन टक्के वाढ झाली असून ब्रँडेड कंपन्यांच्या वह्या आकर्षक कव्हरमुळे महागलेल्या आहेत. (वार्ताहर)>दप्तरांच्या किमतीत वाढगतवर्षीच्या तुलनेत दप्तरांच्या किमतीत पंधरा टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी दप्तरासाठी २५० ते ५०० रुपये मोजावे लागत होते त्या दप्तरासाठी आता ३५० ते ८०० रुपये मोजावे लागत आहेत. शालेय दप्तरासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने दप्तरावरील आकर्षक डिझाईनचा समावेश करण्यात आल्याने किमती वाढल्याचे विक्रे ते सांगतात.