पारनेरच्या पाच नगरसेवकांना अजित पवारांनी अखेर मिलिंद नार्वेकरांकडे सोपविले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 03:34 PM2020-07-08T15:34:51+5:302020-07-08T15:51:39+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी (४ जुलै) राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला.
मुंबई : पारनेरच्या पाच नगरसेवकांनी महाविकास आघाडीमध्ये मोठा पेचप्रसंग उभा केला होता. काही दिवसांपूर्वी थेट बारामती गाठत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिवसेनेच्या जिव्हारी लागले होते. अखेर दोन दिवसांच्या शरद पवार, अजित पवार यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा करत हा पेच सोडविला आहे. अखेर अजित पवारांनी या पाचही नगरसेवकांना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे सोपविले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन करून नगरसेवकांना परत पाठवा, असा निरोप दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर कामाला लागले. त्यांच्या मुत्सद्देगिरीला यश आलं आहे. राष्ट्रवादीत गेलेले पाच नगरसेवक स्वगृही परतले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी (४ जुलै) राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला. महाविकास आघाडीतील समन्वयावरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला. अजित पवारांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा प्रवेश झाल्यानं ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. आमचे नगरसेवक परत पाठवा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मंगळवारी सायंकाळी अजित पवार आणि ठाकरेंची मुंबईत सुमारे दीड तास बैठक झाली.
यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना अजित पवारांनी मंत्रालयात बोलावून घेतले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत ते पाचही नगरसेवक हजर झाले. आता नार्वेकर आणि लंके हे या नगरसेवकांना मातोश्रीवर घेऊन जाण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे लंके हे देखील आधी शिवसेनेतच होते. मात्र, विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पारनेर नगरपंचायतीची पुढील दोन महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यता आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
1962चे युद्ध हरल्यानंतर नेहरू, यशवंतराव देखील सीमेवर गेले होते; शरद पवारांकडून मोदींची स्तुती
मुंबई सावरली! आज दिवसभरात केवळ ७८५ नवे रुग्ण सापडले
एकाच दिवशी भाजपच्या तीन आमदारांना कोरोना; दोन पुण्यातील
मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला? शरद पवारांनी दिले भाजपला उत्तर
CBSE चा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नववी, बारावीचा अभ्यासक्रम कमी केला
चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान मागे आले!
एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले