मुंबई : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो-७ मार्गाच्या बांधकामाचा भाग कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास गोरेगाव येथील आरे जंक्शन परिसरात घडली. सुदैवाने दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो-७ मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. शनिवारी मेट्रोचे काम सुरू असतानाच, दुपारी गोरेगाव येथील आरे जंक्शन परिसरात मेट्रोच्या बांधकामाचा भाग कोसळला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनीही या घटनेला दुजोरा दिला असून, दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे म्हटले आहे.
मेट्रोच्या बांधकामाचा भाग कोसळला, सुदैवाने दुर्घटनेत जीवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 6:46 AM