मुंबई : अजित पवारांचे चिरंजीव आणि लोकसभेचे पराभूत उमेदवार पार्थ पवार यांनी राम मंदिर आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर मत व्यक्त केले होते. यावर जाहिररित्या शरद पवारांनी फटकारल्यानंतर पवार कुटुंबातील कलह पुन्हा समोर आला होता. यावर पार्थ पवार यांची नाराजी घालविण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरु आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी बंड केले होते. तेव्हा ते त्यांच्या भावाकडे थांबले होते. आज पार्थ पवार काका श्रीनिवास पवार आणि काकी शर्मिला पवार यांच्याकडे एकटेच जाणार आहेत. अजित पवार कण्हेरीमध्ये येणार नसल्याचे शर्मिला पवार यांनी सांगितले आहे.
पार्थ पवार लहान आहे, हळूहळू तयार होतील पण असं जाहिरपणे त्याला बोलणं योग्य नाही अशी नाराजी अजितदादांनी शरद पवारांना बोलून दाखवल्याची माहिती आहे. त्यानंतर आता पार्थ पवार नेमकी पुढील भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांनी आज पुण्यात झेंडावंदन केले. पार्थ पवारही काल पुण्यात आले होते. पार्थ पवारांची समजूत घालण्यासाठी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी बोलावले आहे. यासाठी अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ असे तिघे तिकडे जाणार होते. मात्र, अजित पवार जाणार नसल्याचे, तसेच पार्थ पवार एकटेच स्नेहभोजनासाठी येणार असल्याचे पवार कुटुंबीयांनी सांगितले आहे.
शरद पवार काय म्हणाले होते?पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, "नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही.
अजित पवारांचे मौन कायमसिल्व्हर ओकवरील रात्रीच्या घडामोडीनंतर गुरुवारी दिवसभर पार्थ पवारच्या गोटात सामसूम होती. तर अजित पवारांनी देखील या विषयावील आपले मौन सोडले नाही. दिवसभराच्या बैठका आटोपून ते तडक पुण्याला निघून गेले.
कोण आहेत श्रीनिवास पवार?श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे धाकटे बंधू आहेत, ते राजकारणात सक्रीय नाहीत, ते उद्योजक आहेत. पण मागील वेळी अजित पवारांनी बंड केले होते तेव्हाही कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी श्रीनिवास पवारांनी पुढाकार घेतला होता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
EPFO मध्ये भ्रष्टाचार; कंपनीकडून 8 लाखांची लाच घेताना सीबीआयची धाड
Video: पुणे! "तुमच्या राज्यात विनापरवानगी आलो"; राज्यपालांची अजित पवारांना कोपरखळी
Independence Day : मुलींचे लग्नाचे वय बदलणार; पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून दिले संकेत
Independence Day : मोठी घोषणा! नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन आजपासून सुरु; पंतप्रधानांनी सांगितला फायदा