शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली; AIIMS रुग्णालयात केले दाखल
2
“निरोप द्यायला सभागृहात यायला हवे ना, फेसबुक लाइव्ह करुन...”; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर
3
“सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार
5
“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी
6
पाकिस्तानच्या आरोपांपासून ते ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होण्याच्या प्रश्नावर Rohit Sharmaची भन्नाट बॅटिंग
7
सेमी फायनलपूर्वी राशिद खानवर ICC ची कारवाई; बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील चूक भोवली
8
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
9
"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं
10
मोठी बातमी : भारतीय संघात अचानक करावा लागला बदल, शिवम दुबे... 
11
'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?
12
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नवनीत राणांनी सविस्तर सांगितले
13
“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार
14
“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
15
₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला
16
“विधानसभेला महायुतीत अजितदादांच्या वाट्याला २० ते २२ जागा येतील”; रोहित पवारांचा टोला
17
"तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नात"; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या,...
18
ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा
19
विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...
20
गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

पार्थ.. जनतेचा विश्वास ‘सार्थ’ ठरवावा लागेल..! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 7:59 PM

साहेबांनी माढ्यातून माघार घेतली आणि त्याचवेळी मावळमधील लोकसभेचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा केली...पार्थ यांची उमेदवारी काही जणांना अपेक्षित असेल तरी साहेबांची माढ्यातून माघार घेणे अनपेक्षित होते.कारण...यावेळी साहेबांनी त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या दिवास्वप्नाचा  ‘ त्याग ’ होता....'

शरद पवार यांनी ज्यांच्यासाठी निवडणूक लढवणे टाळले ते पार्थ पवार म्हणजे फार मोठी राजकीय समज असलेले कोणी  असेल असे कोणाला वाटत असेल तर त्याची फसगतच होईल. २८ वर्षांचा एक साधा युवक, वाणिज्य शाखेचे पदवीपर्यंतचे शिक्षण व व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक ही त्यांची ओळख. मात्र घराण्याची ओळख पाठीशी असल्याने त्यांनी एकदमच मोठी राजकीय संधी मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव, माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचे भाचे ही त्यांची ओळखच आता त्यांच्यासाठी महत्वाची ठरली आहे. शरद पवार यांनी काही दिवसांपुर्वीच पार्थ निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले होते. त्यानंतर लगेचच त्यांनी घुमजाव करत पार्थचा विचार करावा लागेल असे म्हणत स्वत: मात्र माढा मतदारसंघातून माघात घेत असल्याचे जाहीर केले. दरम्यानच्या काळात पवार कुटुंबियात काय घडले याची चर्चा आता राज्यात सर्वत्र होत आहे. पार्थ यांना हे सगळे मागे सारून पुढे यावे लागले. कार्यकर्त्यांचे मोहोळ मागे उभे आहे तेसुद्धा अजित पवार यांच्यामुळे हे त्यांना लक्षात घ्यावे लागेल. अन्य राजकीय वारसदारांप्रमाणे पार्थ यांनी राजकारणात अजून उल्लेखनीय असे काहीही केलेले नाही. ही कोरी पाटी त्यांना फायद्याची आहे तसेच तोट्याचीही! तीन पिढ्यांचा राजकीय वारसा समर्थपणे चालवू असा विश्वास निर्माण न करताच ते राजकारणात मोठी उडी घेत आहेत. आतापर्यंतचे त्यांचे काम म्हणजे  पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बारामती विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे, कामांची आखणी करणे या स्वरूपाचे आहे.  थेट राजकारणात उडी घेऊन लगेचच लोकसभेची निवडणुक लढवणे सोपे नाही हे त्यांना आता जाणवेलच. कार्यकर्त्यांच्या गर्दीपेक्षाही मतदारांचा विश्वास मिळवणे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. अजित पवार यांच्यासारखे दिसत असले तरी पार्थ यांचा स्वभाव मात्र त्यांच्यापेक्षा वेगळा असल्याचे सांगितले जाते. त्वरीत रिअ‍ॅक्ट न होणे, मोठ्याने न बोलणे, समोरच्याचे ऐकणे हे गूण त्यांच्यात असल्याचे कार्यकर्ते म्हणतात. राजकीय नेत्यांसारखे तर ते मुळीच दिसत नाही. त्यातही वाचनांची त्यांना आवड आहे. त्यामुळे राजकारणाची घाईगडवड त्यांच्या कितपत अंगवळणी पडेल याची शंकाच कार्यकर्त्यांमध्ये असेल. ती दूर करण्याचा प्रयत्न पार्थ यांना करावा लागेल. मात्र तेवढयाने भागेल असे नाही. पवार कुटुंबातील असल्याने आता त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष असेल. जाहीर सभांमध्ये त्यांना ऐकले जाईल. सातत्याने कुटुंबातील कोणाशी तरी तुलना केली जाईल.  वागण्या बोलण्यात थोडे जरी काही चुकले तरी त्याचा बाऊ केला जाईल. या मतदारांचा विश्वास मिळवण्यासाठी त्यांना ‘पार्थ पवार’ अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करावी लागेल. तरच त्यांना पुढे जाणे जमेल. वाटचाल सोपी नाही एवढे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. 

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार