शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थ्यांना मुभा

By admin | Published: June 10, 2016 1:07 AM

नॅशनल स्किल कॉलिफिकेशन फ्रेमवर्कवर (एनएसक्यूएफ) आधारित राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत सुरू

पुणे : नॅशनल स्किल कॉलिफिकेशन फ्रेमवर्कवर (एनएसक्यूएफ) आधारित राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या व्यावसाय शिक्षण लेव्हल ३ निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी आॅनलाईन प्रवेश पध्दतीने सर्व शाखांमध्ये अर्ज करता येणार आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला असला तरी मान्यता असलेल्या शहरातील ५ शाळांमध्ये व्यवसाय शिक्षणचे विषय शिकविण्याची मुभा त्यांना राहणार आहे. शिक्षण विभागाने प्रथमच या विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील जागांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यात व्यवसाय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच विशेष सुविधा देण्यात आली आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत एनएसक्यूएफवर आधारित व्यावसाय शिक्षण माध्यमिक स्तर या योजनेमध्ये राज्यातील २०१४-१५ पासून व्यावसाय शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरांवर सुरू करण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ दिला जात आहे. पुणे महानगरपालिकेच्या ५ उच्च माध्यमिक शाळांमध्ये एनएसक्यूएफनुसार मल्टी स्किल व रिटेल हे व्यवसाय शिक्षणाचे विषय इयत्ता अकरावी व बारावी करिता लेव्हल ३ व ४ सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इयत्ता दहावीमध्ये मल्टी स्किल, रिटेल व आॅटो लेवल २ पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना लेवल ३ व ४ चे शिक्षण घेता येणार आहे.पुणे विभागाच्या सहायक संचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, व्यवसाय लेवल ३ निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेच्या महाविद्यालयामध्ये अर्ज करता येईल. त्यांना अकरावी प्रवेशाबरोबरच मान्यता असलेल्या माध्यमिक शाळांममधून शिक्षण घेण्याची संधी असेल. येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र विद्यालय, बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय, मंगळवार पेठेतील बाबूजीराव सणस कन्याशाळा, भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले शाळा, शिवाजीनगर येथील हुतात्मा बालवीर विद्यालय, शिरीषकुमार विद्यालय या मान्यता असलेल्या माध्यमिक शाळेतून विद्यार्थ्यांना व्यवसाय विषय शिकण्याची मुभा असेल.