मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली संपत्ती जाहीर करावी तसेच त्यांच्याविरोधातील प्रलंबित खटले आणि गुन्ह्यांचा तपशील प्रतिज्ञापत्रवर द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आह़े
विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांनीदेखील प्रतिज्ञापत्रवर संपत्ती जाहीर करावी व इतर तपशील द्यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आह़े तसेच या याचिकेत राज, उद्धव व आदित्य यांच्यासह केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाला प्रतिवादी करण्यात आले आह़े या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार असून, बुधवारी मतदान आह़े त्यामुळे या याचिकेवर न्यायालय काय आदेश देणार, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आह़े भिवंडी येथील श्रीप्रकाश नील यांनी ही जनहित याचिका केली आह़े पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपा या पक्षाचा प्रचार करताना स्वत:ही निवडणूक लढवली होती़ त्यामुळे त्यांची संपत्ती व त्यांचा इतर सर्व तपशील जनतेसमोर स्पष्ट होता़ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील निवडणूक लढवतात़ त्यामुळे त्यांची संपत्ती व इतर माहिती सर्वाना ज्ञात आह़े मात्र ठाकरे बंधूंची संपत्ती अजूनही जनतेसमोर जाहीर झालेली नाही, हे गैर आह़े कारण मतदार बहुतांश वेळा पक्षप्रमुखाच्या भावनिक आवाहनावर मतदान करीत असतात़ तेव्हा मतदाराला पक्षप्रमुखाची सर्व माहिती असणो गरजेचे आह़े ठाकरे बंधू हे उच्चभ्रू जीवनमान जगतात़ ते परदेश दौ:यावर असतात व त्यांच्याकडे आलिशान वाहने आहेत़ त्यामुळे त्यांची संपत्ती जाहीर झालीच पाहिज़े यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आला आह़े (प्रतिनिधी)
इतरांनीही संपत्ती जाहीर करावी
राज, उद्धव यांच्यासह निवडणूक न लढवणा:या पक्षप्रमुखांना संपत्तीसह इतर माहिती जाहीर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अर्जात करण्यात आली़ मात्र याबाबत आयोगाने काहीच केले नाही; तेव्हा आता न्यायालयानेच हे आदेश द्यावेत, असे नील यांचे म्हणणो आह़े