शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

येत्या ८ दिवसांत पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्या; बारामतीत अजित पवारांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 9:12 PM

लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार यांनी बारामतीच्या राजकारणात बारकाईने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.

बारामती - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार दोन  दिवशीय बारामती दाैऱ्यावर आले आहेत. लोकसभा निकालानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्शन मोडमध्ये येत आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. बारामती तालुक्यात राष्ट्रवादी पक्षात कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात राजीनामे देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी(दि ५) बारामती येथे दिले.

लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार यांनी बारामतीच्या राजकारणात बारकाईने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभुमीवर पवार यांनी बारामतीत महत्वाच्या विकासकामांमध्ये लक्ष घालत कार्यकर्ते यांच्या कार्यपध्दतीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे  शहर, तालुक्यात आता खांदेपालट होण्याचे संकेत पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार बारामतीत पक्ष पातळीवर पक्षनिष्ट आणि नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि. ५) बारामतीत आयोजित मेळाव्यात पवार यांनी पदाधिकाऱ्यांकडे राजीनामे मागितले.

पवार हे रविवारपासून बारामती दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांचा बोरकरवाडी येथे जाहीर कार्यक्रम झाला. त्यानंतर ते बाबुर्डी येथे गेले. जिरायती दौऱ्यात काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीबाबत अनेकांनी पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यावर पवार यांनी सोमवारी तात्काळ निर्णय घेतला. पवार म्हणाले,म्हणाले, आपल्याच स्टेजवर बसायचे आणि आपला कार्यक्रम करायचा असे चालले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले की, दादा तुमचा म्हणवला जाणारा कार्यकर्ता प्रत्यक्षात तुमचा नाही. एवढे दिले आणि काम मात्र चुकीचे करायचे. हे चालणार नाही. अशा अनेक गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत, पाहायला मिळाल्या आहेत. इथे बसणाऱ्या प्रत्येकाने आत्मपरिक्षण करावे, आपण प्रतिनिधित्व करत असताना स्वतःच्या बुथवर जिथे मतदारयादीत नाव आहे, तेथे तरी घड्याळाला मताधिक्य मिळाले का असा सवाल त्यांनी केला. तसेच १५ ऑगस्टपूर्वी नवीन निवडी केल्या जातील असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४