शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

सोलापूरमध्ये साकारतंय 5 जिल्ह्यांसाठी पासपोर्ट ऑफिस

By admin | Published: May 16, 2017 3:59 PM

सिद्धेश्वर मंदिरालगत असलेल्या रिपन हॉल या ऐतिहासिक इमारतीमध्ये लवकर सोलापूरचे पासपोर्ट कार्यालय सुरू होणार आहे.

ऑनलाइन लोकमत /शिवाजी सुरवसे 
सोलापूर, दि. 16 - सिद्धेश्वर मंदिरालगत असलेल्या रिपन हॉल या ऐतिहासिक इमारतीमध्ये लवकर सोलापूरचे पासपोर्ट कार्यालय सुरू होणार आहे. हेरिटेज इमारत असली तरी या इमारतील धक्का न लावता मॉर्डन लूक दिला असून यामुळे सोलापूरचे नाव आता देशाच्या नकाशावर कोरले जाणार आहे.
 
सोलापूर हे अनेक शहरांना महामार्गांच्या माध्यमातून जोडले जात आहे. शिवाय या ठिकाणी रेल्वेचे सुविधा देखील उत्तम आहे आणि येत्या सप्टेंबर पासून सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होत असल्यामुळे सोलापूरचे रुप पालटू लागले आहे. सोलापूर-पुणे महामार्गाचे झालेले चौपदरीकरण, सोलापूर-येडशी महामार्गाचे सुरू असलेले युद्धपातळीवरील काम, सोलापूर हैद्राबादचे चौपदरीकरण ही कामे सध्या सुरू असून सोलापूर शहर-परिसरात महामार्गांचे गुळगुळीत जाळे निर्माण केले जात आहे.
 
त्यामुळे पासपोर्ट कार्यालयास पुणे,  सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे जोडल्यामुळे देखील जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन वाढले अशी आशा आहे़ वास्तविक पाहता उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड हे जिल्हे देखील पासपोर्टसाठी सोलापूरला जोडले जावेत यासाठी लोकप्रतिनिधींनी आपले वजन वापरण्याची गरज आहे. सिद्धेश्वर मंदिराशेजारी असलेल्या महापालिकेच्या रिपन हॉल या ऐतिहासिक वास्तूमध्ये पासपोर्ट कार्यालय चे काम सुरू आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे काम पूर्णत्वाच्या दिशेला आहे़ महिनाअखेर पर्यंत  सर्व कामे पूर्ण होतील अशा पद्धतीने युद्धपातळीवर विविध कामे सुरू आहेत.
 
रिपन हॉल ही सुमारे १८७० ची इमारत आहे़ महापालिकेने ही इमारत पासपोर्ट विभागाला भाड्याने दिली आहे. मुख्य इमारत सुमारे ५५० फुटांची आहे तर बाहेरील जागा ही सुमारे १४५०० चौरस फुटांची आहे़ पासपोर्ट विभाग सुरू करण्यासाठी या इमारतीमध्ये १ कोटी ४८ लाखांचे इलेक्ट्रिकल्सचे काम, ११५ लाखाचे सिव्हिल वर्क आणि ७५ लाखांचे फर्निचर अशी कामे आहेत़ इलेक्ट्रिकल्स काम, सिव्हिल काम तसेच फर्निचर अशी विविध सुमारे ३२८ कोटी रुपयांची कामे गतीने सुरू आहेत.
 
२० मे पर्यंत बहुतांश कामे पूर्ण होतील असे नियोजन केले जात आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी़सी़ रेळेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ऋषीकेश कुलकर्णी हे या कामाचे आर्किटेक्ट असून एक साधे होल देखील न पाडता रिपन हॉलच्या इमारतीला नवा साज चढविण्याचा प्रयत्न केला असल्याचे कामातून दिसून येते.
 
सध्या टॉयलेट बांधकाम, कंपाउंड वॉल, प्लोरींगचे काम, पार्किंग, फर्निचर, वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्षात पासपोर्टचे कार्यालय सुरू होणार आहे़ शहराच्या मध्यवर्ती भागात हे कार्यालय होत असून ही रिपन हॉलची जागा पासपोर्ट विभागाला महापालिकेने भाड्याने दिली आहे़ या कार्यालयामुळे या परिसराची शोभा वाढविली जात आहे. 
 
सोलापूरचे पासपोर्ट कार्यालय हे पाच जिल्ह्यासाठी असेल़ पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातील कोणताही नागरिक या कार्यालयातून पासपोर्ट काढेल़ कार्यालयाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे़ जून महिन्याचे याचे उद्घाटन केले जाईल- अतुल गोतसुर्वे, विभागीय पासपोर्ट अधिकारी 
 
पासपोर्ट कार्यालयाशेजारी अतिक्रमण
शहरातील सर्वांणसुंदर आणि सोलापूरची शोभा ववाढवेल असे सुंदर पासपोर्ट कार्यालय होत असून या कार्यालयाशेजारीच एका व्यक्तीने झोपडी थाटून अतिक्रमण केले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने याकडे लक्ष द्यावे आणि तातडीने हे अतिक्रमण काढावे अशी मागणी पासपोर्ट कार्यालयाने पत्राद्वारे केली आहे़ सर्व सुविधायुक्त पासपोर्ट कार्यालय हे आता सोलापूरची नवी ओळख ठरणार आहे.