- डिप्पी वांकाणी, मुंबईआपल्या आयुष्याचा जोडीदार वधू-वर सूचक मंडळाच्या संकेतस्थळांवर (मॅट्रिमोनियल वेबसाइट्स) शोधणाऱ्यांना आपले नाव तेथे नोंदविण्यासाठी आता आपला पासपोर्ट क्रमांक आणि आधार कार्डचा तपशील द्यावा लागेल. नायजेरियन लबाडांनी बनावट प्रोफाइल्स तयार करून इच्छुक परंतु भोळसट उमेदवारांची फसवणूक करण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या आठवड्यात मॅट्रिमोनियल पोर्टल्सना वरील तपशील देणे बंधनकारक करण्यास सांगणार आहे. हा आवश्यक तपशील पोर्टल्स स्वीकारणार नाही, त्यावेळी जी माहिती अपलोड केली आहे तिची शहानिशा सरकारी यंत्रणा करील व त्यानंतर युजरला वन टाइम पासवर्ड (ओटीपी) दिला जाईल. आम्ही केवळ माध्यम आहोत आणि विवाह करू इच्छिणाऱ्या दोन प्रौढांना भेटण्याचे केवळ ठिकाण म्हणून काम करतो, असे सांगून पोर्टल्स आपली जबाबदारी झटकत आले आहेत.इंडियन मॅट्रिमोनियल पोर्टल्सवर अनिवासी भारतीय (एनआरआय) किंवा पीआयओला (पर्सन आॅफ इंडियन ओरिजिन) प्रोफाइल तयार करायचे असल्यास त्यांना कोणती माहिती द्यावी लागेल, असे विचारता हा अधिकारी म्हणाला की, प्रत्येक देशाचा त्याच्या नागरिकासाठी युनिक आयडी असतो. अशी कोणती माहिती ते देऊ शकतील, की जिची आम्ही शहानिशा करू शकू. त्यासाठी आम्ही सायबर आणि तांत्रिक तज्ज्ञांशी चर्चा करीत असून लवकरच ती संपेल.भावनांचा घेतात गैरफायदाअधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नायजेरियन लबाडांनी इच्छुक वधू आणि वरांची फसवणूक केली आहे. या लबाडांची काम करण्याची पद्धत अशी आहे, की ते श्रीमंत व्यावसायिक किंवा अनिवासी भारतीय आहे असे बनावट छायाचित्र वापरून प्रोफाइल तयार करतात. त्यानंतर पुन्हा लग्न करू इच्छिणाऱ्या विधवा किंवा विधुरांशी चॅटिंग सुरू करतात. ते त्यांच्या भावनांचा गैरफायदा घेत त्यांना आपल्या जाळ््यात ओढण्यासाठी खोटी आश्वासने देतात.मध्यरात्री ते आपल्या सावजाला (विधुर किंवा विधवा) फोन करतात व तुला भेट देण्यासाठी घेऊन आलेल्या महागड्या दागिन्यांसह कस्टम्सने मला पकडले आहे, असे सांगतात. कस्टम्समध्ये पैसे भरण्यासाठी बँक खात्यात पैसे जमा करण्यास ते इच्छुकाला सांगतात व नंतर त्यांच्याशी संपर्कच होत नाही, असे हा अधिकारी म्हणाला. आपली जबाबदारी झटकणाऱ्या पोर्टल्सना आम्ही पत्र लिहिणार आहोत. तुमची जबाबदारी अधिक असून, जे लोक प्रोफाइल तयार करू इच्छितात त्यांना साइनअप करण्यासाठी आणखी काही गोष्टींची भर त्यात घातली पाहिजे, असे आम्ही त्यांना सांगणार आहोत, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.या संकेतस्थळांवर जे आपली माहिती देऊ इच्छितात (साइनअप) त्यांची विश्वासार्हता काय, हे आता आम्हाला तपासून बघायचे आहे. पोर्टल हा तपशील बघू शकणार नाही. परंतु हा तपशील थेट सरकारी यंत्रणेकडे जाईल व ही यंत्रणा संपूर्ण स्वयंचलित पद्धतीने अतिशय झटपट या माहितीची शहानिशा करून उपलब्ध माहिती त्यांनी दिलेल्या माहितीशी जुळणारी असेल तर वन टाइम पासवर्ड तयार करील. त्यानंतरच इंडियन मॅट्रिमोनियल पोर्टल्स तयार करता येईल, असे हा अधिकारी म्हणाला.
आॅनलाइन स्थळांसाठी पासपोर्ट, आधार सक्तीचे!
By admin | Published: January 14, 2016 4:12 AM