पतंगराव कदम यांच्यावर शनिवारी सांगलीमधील वांगी येथे होणार अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 12:40 AM2018-03-10T00:40:44+5:302018-03-10T00:42:14+5:30
काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्यावरवाजता सांगलीमधील वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्याच्या आवारात शनिवारी संध्याकाळी 4 अंत्यसंस्कार होतील. तत्पूर्वी शनिवारी पुण्यातील सिंहगड बंगला या राहत्या घरी त्यांचे पार्थिव सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
मुंबई - काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्यावरवाजता सांगलीमधील वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्याच्या आवारात शनिवारी संध्याकाळी 4 अंत्यसंस्कार होतील. तत्पूर्वी शनिवारी पुण्यातील सिंहगड बंगला या राहत्या घरी त्यांचे पार्थिव सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. नंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी सांगली येथे रवाना होईल.
राज्याच्या राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे, सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या अर्थकारणाला दिशा देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांचे शुक्रवारी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी निधन झाले होते. ते ७४ वर्षांचे होते. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अयशस्वी ठरली. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी सकाळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, चिरंजीव युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, ज्येष्ठ बंधू आमदार मोहनराव कदम, डॉ. शिवाजीरा कदम, रघुनाथराव कदम, जयसिंगराव कदम, आकाराम कदम, स्नुषा स्वप्नाली, मुलगी भारती महेंद्र लाड व अस्मिता राजेंद्र जगताप, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. कदम कुटुंबियांनी त्यांच्या उपचाराबाबत गोपनीयता बाळगली होती. निकटवर्तीय कार्यकर्ते, समर्थक तसेच काँग्रेसच्या पदाधिकाºयांनाही याबाबत माहिती नव्हती. भेटणा-यांची गर्दी वाढली तर उपचाराला अडथळे येतील, म्हणून ही माहिती कोणालाही देण्यात आली नव्हती. मात्र त्यांच्या आजाराबाबतची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आजारातून ते सुखरुप बाहेर यावेत म्हणून जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, निकटवर्तीय लोक प्रार्थना करीत होते. अखेर या सर्वांनाच धक्का देणारी बातमी शुक्रवारी रात्री धडकली आणि अनेकांच्या डोळ््यात अश्रू उभे राहिले.