शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पतंगराव कदम नावाचं वादळ शमलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 10:33 PM

एका छोट्या कुटुंबातून पुढे आलेले हे राजकिय वादळाच होतं असं म्हणायलं हवं

मुंबई -  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी 74 व्या वर्षी लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास घेतला. गेल्या सहा महिन्यापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. एका छोट्या कुटुंबातून पुढे आलेले हे राजकिय वादळाच होतं असं म्हणायलं हवं. 

कसा होता त्यांचा कार्यकाळ - सांगली जिल्ह्यातील सोनसळ या लहान खेड्यातील शेतक-याचा हा मुलगा. गावात चौथीपर्यंतच शाळा, पुढे कुंडलला माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुणे गाठले. द्विपदवीधर झाले. शिक्षक झाले. एक शिक्षकी शाळेत काम केले. राजकीय, शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. मात्र, काहीतरी आगळंवेगळं करायचं असं त्यांच्या मनात पक्कं होतं. नावामागे डॉक्टरेट लागली. कुलपती पद लागले. आमदारपद आले. मंत्रिपद आले. ज्या ज्या क्षेत्रात काम करण्याची ऊर्मी बाळगली, त्यात यशस्वी होतच गेले. काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून धडपडणारा एक छोटा कार्यकर्ता १९८० मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि दोन-अडीचशे मतांनी पराभूत झाले. ही पहिलीच निवडणूक होती. सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भरभक्कम होती, तेव्हा अपक्ष निवडणूक लढविण्याचे धाडसच आहे.पराभव झाला म्हणून खचून जाणारे ते पतंगराव कदम नव्हते. १९८५ मध्ये पुन्हा लढत दिली आणि आमदार झाले. तेव्हापासून १९९५ चा अपवाद वगळला तर सहावेळा निवडून आले. राजकारणात यशामागून यश मिळत असताना गावची कामं करणे कधी सोडले नाही. वास्तविक, पतंगराव कदम यांच्या राजकारणाची अधिक चर्चा होते; पण ते खरे शिक्षण प्रचारक-प्रसारक आहेत. सामान्य माणसांच्या घरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे, यासाठी १९६७ मध्ये स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाचा प्रचंड विस्तार वाढत राहिला. सहकारातील त्यांच्या कामाची चर्चा कमी होते. त्यांनी बँक, सूत गिरण्या, साखर कारखाने स्थापन केले. या सर्व संस्था उत्तम चालविल्या आहेत. त्यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त सांगलीत निवडक पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते, मला सांगलीत भव्यदिव्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करायचे आहे. तो शब्द खरा करण्यासाठी केवळ एकच वर्ष लागले. २००५ मध्ये ६१ व्या वाढदिवसाच्या वेळी त्यांनी ५० एकरांवरील वैद्यकीय महाविद्यालयाचा पाया खोदला. बारा वर्षांत त्या जागेवर शंभर कोटी रुपयांचा वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर फुलला आहे. उत्तम सेवा, गरिबांना आधार देणाऱ्या योजना येथे सुरू आहेत.आपल्या मतदारसंघाचा कायापालट कसा करावा, याचे उत्तम उदाहरण त्यांचा पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात दोन तालुके स्थापन केले. त्या तालुक्यांची सर्व कार्यालये पाच वर्षांत पूर्ण बांधून काढली. ताकारी योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहून कृष्णेच्या पाण्याच्या शिंपणाने कडेगाव तालुक्याचे नंदनवनच झाले आहे. अशी असंख्य कामे करताना अगदी मोकळा स्वभाव आणि धाडसीपणा ही दोन्ही रूपे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सातत्याने दिसतात. गरिबांविषयी प्रचंड कणव व श्रीमंताविषयी आकस नाही; पण आपणाला जे मिळाले आहे ते इतरांना दिले पाहिजे, ते सर्वांना वाटले पाहिजे असे ते एकदा म्हणाले आणि तसेच वागत राहिले. त्यामुळेच एक सामान्य माणूस वादळासारखा सतत सार्वजनिक कामात गर्जत राहिला.

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमcongressकाँग्रेस