पाटस : पाटस (ता. दौंड) येथे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे संकट उभे राहिले असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तेव्हा खडकवासला धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी पाटस ग्रामपंचायतीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मुठे यांच्याकडे करण्यात आली आहे. पाटस परिसराला पाणीपुरवठा करणारा तलाव पूर्णपणे आटला आहे, तर विहिरीचे पाणी खोलवर गेले आहे. हातपंपांना पाणी नाही अशा परिस्थितीत ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तेव्हा तातडीने पाणी सोडण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले.याप्रसंगी सरपंच शीतल भागवत, ग्रामपंचायत सदस्य आशा शितोळे, संभाजी चव्हाण, सागर शितोळे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर खारतोडे, अरविंद म्हस्के, राहुल भागवत, महेश भागवत उपस्थित होते.(वार्ताहर)>दौंड आणि इंदापूरच्या पाण्यासाठी प्रयत्न पाटस ग्रामपंचायतीचे शिष्टमंडळ आमदार दत्तात्रेय भरणे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांना भेटले. दरम्यान, खडकवासलाचे आवर्तन सोडावे की जेणेकरून पाटस आणि परिसरातील पिण्याच्या पा ण्याचा प्रश्न सुटेल. यावर दत्तात्रय भरणे आणि रमेश थोरात म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांबरोबर योग्य ती चर्चा करून दौंड आणि इंदापूरला पाणी सोडण्याबाबत प्रयत्न केले जाईल.
पाटसला विहिरी, तलाव आटले
By admin | Published: April 27, 2016 1:26 AM