शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

एमपीएससीच्या सदस्यपदी पटेल

By admin | Published: July 01, 2014 10:54 PM

आयोगासमोर मुलाखत देणारा आयोगाच्याच सदस्यपदी आरूढ

जळगाव जामोद : जळगाव जामोद तालुक्यातील पळशी वैद्य येथील मूळ निवासी अँड.हमीद पटेल यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदापर्यंंत पोहचणारे बुलडाणा जिल्ह्यातील ते पहिले ठरले आहेत. राज्य शासनाच्या अप्पर सचिव पदासाठी ज्या आयोगासमोर अँड. हमीद पटेल यांनी २५ वर्षांपूर्वी मुलाखत दिली होती, त्याच आयोगाच्या सदस्यपदी आरूढ होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. यापुर्वी अँड. हमीद पटेल हे विधी, न्याय व सांसदीय कार्य विभागाच्या प्रधान सचिव पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या रुपाने या जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या अध्यक्ष आणि सदस्य या पदांवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच राज्याचे परिवहन आयुक्त विठ्ठल मोरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव अँड.हमीद पटेल यांची सदस्य म्हणून निवड आयोगावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विविध खात्यांचे अधिकारी निवड करण्याचे काम एमपीएससीव्दारे केले जाते. २५ वर्षापूर्वी याच आयोगासमोर अप्पर सचिव पदासाठी अँड.हमीद पटेल यांनी मुलाखत दिली होती. त्यावेळी दोन अप्पर सचिवाची केवळ पदे भरावयाची होती. त्याकरिता तब्बल दोन दिवस मुलाखतीची प्रक्रीया चालली होती. त्यानंतर अँड.पटेल यांची निवड करण्यात आली होती. आता २५ वर्षानंतर अँड.हमीद पटेल यांचीच या आयोगावर सदस्यपदी निवड झाली आहे. सदस्यपदाची नियुक्ती चार वर्षाकरिता करण्यात आली आहे.