शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पटेल आंदोलनाने दिल्लीचे राजकारण तापले, गुजरातेत तणावपूर्ण शांतता

By admin | Published: August 28, 2015 3:08 AM

हार्दिक पटेल यांच्या आंदोलनाने गुजरातमध्ये भडकलेल्या हिंसाचारानंतर दिल्लीचे राजकारण चांगलेच तापले असून बिगर भाजप पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला लक्ष्य

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीहार्दिक पटेल यांच्या आंदोलनाने गुजरातमध्ये भडकलेल्या हिंसाचारानंतर दिल्लीचे राजकारण चांगलेच तापले असून बिगर भाजप पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला लक्ष्य केले आहे. आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले नसल्याचे मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल म्हणत असतील तर गोळीबाराचे आदेश कुणी दिले, असा प्रश्न मोदींच्या राजकीय विरोधकांनी उचलून धरला असून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदींना धारेवर धरले आहे. गुुरुवारी राहुल गांधी जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर पोहोचले. यावेळी श्रीनगरपासून २५ किमी अंतरावरील पंपोर शहरानजीकच्या एका गावात शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित करताना पटेल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदींना जोरदार लक्ष्य केले. पंतप्रधान द्वेषाचे राजकारण करीत आहेत. सध्या गुजरातमध्ये त्याचेच परिणाम दिसत आहेत, असे राहुल यावेळी म्हणाले. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी यानिमित्ताने गुजरात सरकार आणि मोदींना लक्ष्य करीत प्रश्नांचा भडिमार केला. गुजरात मॉडेलचे वास्तव काय? लोकांनी निवडून दिलेले सरकार आपल्या लोकांवर असे अत्याचार करणार का? गोळीबार-लाठीमाराने समस्येवर तोडगा निघणार का? गोळीबाराचे आदेश आनंदीबेन यांनी दिले नसतील तर ते कुणी दिले? असे सवाल सुरजेवाला यांनी केले. काँग्रेसने पटेल आंदोलनास खुला पाठिंबा देणे टाळले असले तरी या मुद्यावर मोदी व मोदी सरकारला धारेवर धरण्याचे काँग्रेसचे मनसुबे यामुळे उघड झाले आहेत. काँग्रेससह डावे पक्ष, आम आदमी पार्टी, जदयू यासारखे पक्षांनीही पटेल आंदोलनावरून मोदी सरकारला घेरण्याचे प्रयत्न चालवले आहेत. गुजरात मॉडेलवर प्रश्नचिन्ह!जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पटेल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ इतकेच यशस्वी आहे तर मग या विकासात वाटा मागणाऱ्या इतक्या आंदोलनकर्त्यांचा मृत्यू का झाला, असे खोचक टिष्ट्वट ओमर यांनी गुरुवारी केले. माकपाचे महासचिव सीताराम येचुरी यांनीही ‘गुजरात मॉडेल’वर तोंडसुख घेतले.हार्दिक यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराअहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या शांततेच्या आवाहनास न जुमानता पटेल समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी गुरुवारी आरक्षण आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.आरक्षणाच्या मागणीच्या समर्थनार्थ पटेल समाजाच्या शेतकऱ्यांनी शहरात भाज्या आणि दूधासारख्या आवश्यक वस्तूंचा पुरवठा बंद करावा, असे आवाहन त्यांनी केले. अनेक शहरांत लष्कर तैनातअहमदाबाद : पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनास हिंसक वळण लागल्यानंतर गुरुवारी गुजरातेत तणावपूर्ण शांतता आहे. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दहावर पोहोचली असून स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अहमदाबाद, सूरत, मेहसाणा अशा अनेक शहरांत लष्कर तैनात करण्यात आले आहे.विधानसभेत गोंधळगांधीनगर : गुजरातेतील पटेल आरक्षण आंदोलन आणि हिंसाचाराच्या मुद्यांवर गुरुवारी काँग्रेस आमदारांनी राज्य विधानसभेत जोरदार गोंधळ घातला. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज अनेकदा स्थगित करण्यात आले. विधानसभेत गोंधळगांधीनगर : गुजरातेतील पटेल आरक्षण आंदोलन आणि हिंसाचाराच्या मुद्यांवर गुरुवारी काँग्रेस आमदारांनी राज्य विधानसभेत जोरदार गोंधळ घातला. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज अनेकदा स्थगित करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी कमीत कमी आठ ठिकाणचे रेल्वे रुळ उखडून फेकल्याने रेल्वेसेवा प्रभावित झाली आहे. यामुळे १२ रेल्वेगाड्या पूर्णत: तर १९ रेल्वेगाड्या आंशिक रूपात रद्द करण्यात आल्या आहेत.जाटही छेडणार आंदोलनगुजरातेतील पटेल समाजाने आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच हरियाणातील जाट समुदायानेही आरक्षणासाठी दंड थोपटण्याची तयारी चालवली आहे. येत्या महिन्यापासून हरियाणातील जाट समुदायही ओबीसी कोट्याअंतर्गत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू करणार आहे.