शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटावरुन आता गोंधळ सुरू झाला आहे, चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी शाहरुख खानने गुरुवारी कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. “जग सामान्य झाले आहे”. आम्ही सर्व आनंदी आहोत. मी सर्वात आनंदी आहे आणि हे सांगण्यास माझा अजिबात आक्षेप नाही की जग काहीही केले तरी मी, तुम्ही आणि सर्व सकारात्मक लोक जिवंत आहोत.', अशी प्रतिक्रिया शाहरुख खानने दिली आहे.
शाहरुख खानच्या या वक्तव्यावर खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही देखील सकारात्मक आहोत." जर एखाद्या गोष्टीने देश दुखावला असेल तर त्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकू नये, सेन्सॉर बोर्डाने चांगले काम करावे, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.
"जर काही अडचण असेल आणि आमच्या भावना दुखावल्या असतील, तर सेन्सॉर बोर्डाने पाहून रिलीज करावे", असंही नवनीत राणा म्हणाल्या.'आम्हीही खूप सकारात्मक आहोत, पण मला वाटतं की आमच्या भावना आणि गोष्टींशी खेळलं जात असेल तर त्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे, आणि त्यांनी आपलं काम करायला हवं. आम्हीही खूप सकारात्मक आहोत. आपल्या देशातील सर्व स्टार्सवर बहिष्कार टाकू नये. ते आपल्या देशाला आर्थिक मदत करतात', अंसही खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
'पठाण' चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगुमध्ये 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'पठाण'चे बजेट 250 कोटी रुपये आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकाशिवाय जॉन अब्राहम देखील दिसणार आहे.