पाटेठाण : पाटेठाण (ता. दौंड) परिसरातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील पाटेठाण, टाकळी भीमा, पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर, आलेगाव या नदीच्या काठावर असलेल्या गावांत जनावरांना; तसेच पिण्याच्या, शेतीसाठी पाण्याच्या संदर्भात गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. भीमा नदीच्या काठावरील असलेल्या शेतातील हिरवीगार पिकेदेखील पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर असून, पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील शेतकरीवर्ग करीत आहे. भीमा नदीच्या पाण्यावर दौंड व शिरूर या दोन्ही तालुक्यांतील पेरणे, पिंपरी सांडस, विठ्ठलवाडी, पाटेठाण, मेमाणवाडी, टाकळी भीमा, अरणगाव, पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर, आलेगाव पागा या गावांसह अनेक गावे शेतीसाठी अवलंबून आहेत. कृषिपंप नदीच्या मध्यावर नेवूनदेखील नदी कोरडी ठाक पडल्याने काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या परिसरातील उभी पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. शिल्लक राहिलेल्या नदीचा खोलगट भाग व झरे यामधून पाणी नेवून पिके जगविण्याची धडपड दिसून येत आहे.
पाटेठाणच्या भीमा नदीचे पात्र कोरडे
By admin | Published: March 02, 2017 1:35 AM