- मच्छिंद्र देशमुखकोतूळ (अहमदनगर) : सापाने दंश केल्याने आदिवासी महिला रुग्णालयात दाखल झाली. रुग्णालयात डॉक्टरांनी उपचार सुरू केले. परंतु २४ तास उलटल्यानंतर रुग्णालयात तिच्या कपड्यांतच साप आढळून आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे ‘त्या’ महिलेचे प्राण वाचले. ही घटना संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर जवळील मामेखेल येथे घडली.मामेखेलमधील इंदूबाई भास्कर करवंदे या १३ जून रोजी नातेवाइकांकडे गेल्या होत्या. आमरसाचे जेवण घेऊन त्या रात्री उशिरा परतल्या. पहाटे पोटात दुखायला लागले, श्वास मंदावला म्हणून त्यांना दुचाकीने अकोले येथील भांडकोळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आंब्याचा रस खाल्ल्याने पोट दुखते, असे सांगितले. मात्र, डॉ. भांडकोळी यांनी लक्षणे पाहून मण्यार हा विषारी साप चावल्याचे सांगितले. रुग्ण बेशुद्ध पडल्याने कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन उपचार सुरू केले. डॉक्टरांनी घरात सापाचा शोध घ्यायला सांगितले. घरालगत एक कवड्या साप सापडला़ डॉक्टरांनी तो बिनविषारी असल्याचे सांगितले. १५ तासांनी रुग्ण महिला जरा शुद्धीवर आली. पहाटे मानेवर व तोंडावर अडीच ते तीन फुटांचा साप वळवळू लागल्याने रुग्णाने हातपाय आपटायला सुरुवात केली. हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ झाला. डॉ. भांडकोळी यांनी अकोले येथील सर्पमित्र धनंजय मोहिते यांना बोलावून साप पकडला तो मण्यारच होता.पेशंट आंबेरस खाल्ल्याने पोट दुखते म्हणून आला. मात्र बेशुद्धावस्थेत महिलेचा श्वास बंद होत चालला होता. रक्ताभिसरण कमकुवत झाले होते. ही सर्व मण्यार दंशाची लक्षणे दिसू लागली. तसाच अंदाज बांधून उपचार सुरू ठेवले. चोवीस तासांनी मण्यार रुग्णाच्या नेसत्या कपड्यातून बाहेर आला. त्याला सर्पमित्रांनी पकडून सोडून दिले.- डॉ. एम. के. भांडकोळी, अकोले,विषारी सापाच्या जाती
रुग्ण शुद्धीवर येताच मण्यार आला बाहेर!; साप २४ तास होता नेसत्या कपड्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 12:08 AM