शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

मुंबईत रुग्णांची वणवण

By admin | Published: March 22, 2017 2:00 AM

गेल्या २४ तासांत राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे रुग्णसेवा बेहाल झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे रुग्णसेवा बेहाल झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील शहर-उपनगरातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची वणवण झालेली दिसून आली. काही रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग बंद दिसून आले, तर काही ठिकाणी निवासी डॉक्टर कामावर नसल्याने रुग्णालय आवारात एकच गर्दी दिसून आली. मुंबई शहर-उपनगरातील रुग्णालयांमध्ये नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. राज्यात धुळे, नाशिक, औरंगाबाद आणि मुंबईतील शीव, वाडिया रुग्णालयांत डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांमुळे निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन केले आहे. यामुळे शहर-उपनगरातील काही रुग्णालयांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्याचे दिसून आले. मुंबईत जे.जे. रुग्णालयात मंगळवारी रुग्णसेवेवर कोणताही परिणाम न झाल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. डॉ. लहाने यांनी सांगितले की, जे.जे. रुग्णालयात दररोज सरासरी १५५ शस्त्रक्रिया होतात, मात्र मंगळवारी १६६ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. तर केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, रुग्णालयात मंगळवारी लहान-मोठ्या अशा एकत्रितपणे ६३ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या सामूहिक रजेमुळे दिवसभरात ५० शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वाट पाहून खासगी रुग्णालय गाठलेआजीची प्रकृती काहीशी खालावल्याने सायन रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेलो होतो. मात्र डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे रुग्णालय आवारातील रुग्णांची गर्दी, डॉक्टरांची कमतरता यामुळे बराच काळ वाट पाहत बसावे लागले. अखेरीस खासगी रुग्णालयात जावे लागले, असे सायन रुग्णालयातील रुग्ण मंगेश खैरनांगर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)