बीड : जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या डोळ्यांना संसर्ग झाल्याने त्यांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र रुग्णांना संसर्ग होतच असतो, असे वक्तव्य करून राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रुग्णांची थट्टाच केली आहे.जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे पाच रुग्णांच्या डोळ्यांना संसर्ग होऊन अंधत्वाचा धोका निर्माण झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावरून औरंगाबादकडे जात असताना आरोग्यमंत्री सावंत यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. माध्यमप्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की, डोळ्यांवर श्स्त्रक्रिया करताना संसर्ग झालेला आहे. संसर्ग होण्याचे प्रकार घडत असतात. रुग्णांवर मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. रुग्णांची दृष्टी वाचविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे त्यांनी या वेळी सांगितले. >च्रविवारी सकाळी ८ वाजता आरोग्य विभागाच्या समितीकडून या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात आली. मुंबईहून आलेल्या या चौकशी समितीत अंधत्व नियंत्रण समितीच्या प्रमुख डॉ. साधना तायडे यांचा समावेश आहे. चौकशीबाबत विचारणा करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.
रुग्णांना संसर्ग होतच असतो!
By admin | Published: April 25, 2016 4:57 AM