शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

शासकीय रूग्णालयातील अधिष्ठातांना करावी लागणार रुग्णसेवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:43 PM

ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणार दिलासा; ओपीडी, आॅपरेशन थिएटरमध्येही जावे लागणार

ठळक मुद्देशासकीय रुग्णालयातील अधिष्ठाता यांनाही आता रुग्णांवर उपचार करावे लागणारनव्या डॉक्टरांना अधिष्ठाता यांच्याकडून शिकता यावे, याकरिता वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून हा निर्णय घेण्यात आला

सोलापूर : शासकीय रुग्णालयातील अधिष्ठाता यांनाही आता रुग्णांवर उपचार करावे लागणार आहेत. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने अधिष्ठातांना फक्त महाविद्यालयाची जबाबदारी सांभाळणे पुरेसे ठरणार नसून, त्यांना आॅपरेशन थिएटर, ओपीडीमध्येही रुग्णसेवा करावी लागणार आहे.

बहुतांश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता हे महाविद्यालयातील केबिनमध्ये बसून काम करतात. महाविद्यालय व विद्यार्थ्यांसंबंधी काम करत असतात. अधिष्ठाता यांना इतर डॉक्टरांच्या तुलनेने अनुभव जास्त असतो. त्यांच्या अनुभवाचा फायदा रुणांना व्हावा, तसेच नव्या डॉक्टरांना अधिष्ठाता यांच्याकडून शिकता यावे, याकरिता वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिष्ठाता कोणत्या वैद्यकीय क्षेत्रात तज्ज्ञ आहेत, त्यांना त्यासंबंंधी रुग्णसेवा द्यायची आहे.

वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या अतिरिक्त सहसंचालकपदी पुण्याच्या ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची निवड झाली आहे. त्यांनी अधिष्ठाता यांना रुग्णसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुुळे राज्यात असणाºया १९ वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांना आता महाविद्यालयाच्या जबाबदाºया सांभाळत रुग्णसेवा करावी लागणार आहे.

अधिष्ठाता यांनी रुग्णसेवा केली तर त्यांना रुग्ण व रुग्णसेवेसंबंधी दिल्या जाणाºया सेवांविषयी अधिक चांगल्या प्रकारे माहिती होणार आहे. रुग्ण, डॉक्टर व कर्मचारी यांना येणाºया समस्या अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना समजू शकणार आहेत. यामुळे रुग्णसेवा तर दर्जेदार होईलच सोबत रुग्ण, डॉक्टर व कर्मचारी यांच्या समस्या सोडवणे देखील सोयीचे होणार आहे. जे अधिष्ठाता न्यायवैद्यक, शल्यविशारद, फिजिशियन तज्ज्ञ आहेत त्यांच्यासाठी या आदेशाचे पालन करणे महत्त्वाचे असणार आहे.

रुग्णांशी थेट संवाद साधता येणार- ठाकूर- अधिष्ठाता यांना रुग्णसेवा देण्याबाबतच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. अधिष्ठाता यांचे पहिले काम हे रुग्णसेवा हेच असायला हवे. त्यामुळे हा निर्णय अगदी योग्य आहे. मी विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच रुग्णसेवाही करत असतो. यामुळे गरजूंना दर्जेदार वैद्यकीय सेवा तर मिळेलच, सोबत रुग्णांशी थेट संवाद साधता येणार असल्याचे शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलGovernmentसरकार