शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मार्ड संपामुळे मुंबईत रुग्णांचे हाल

By admin | Published: July 03, 2015 3:29 AM

‘डॉक्टर आलेत का, आज तपासणीचा वार होता.’ ‘आता त्रास होतोय का?, मग आज तपासणी होणार नाही.’ नंतर या.... मात्र ज्यांना त्रास होत असेल, त्यांच्याशी होणारा संवाद थोडा

मुंबई : ‘डॉक्टर आलेत का, आज तपासणीचा वार होता.’ ‘आता त्रास होतोय का?, मग आज तपासणी होणार नाही.’ नंतर या.... मात्र ज्यांना त्रास होत असेल, त्यांच्याशी होणारा संवाद थोडा वेगळा होता. ‘तुम्हाला त्रास होतोय ना? चला, तिथे आत जा.’ असे सांगत विविध सरकारी, महापालिका रुग्णालयांमधील सीनियर डॉक्टर ‘मैदानात’ उतरल्याचे मार्ड संपावेळी दिसून आले. मार्डने त्यांच्या १० प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील ४ हजार निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या मास बंकमुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. पण, सीनियर डॉक्टर्सच्या उपस्थितीने अधिक हाल होणे टळले. वरिष्ठ डॉक्टर अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करताना दिसत होते. या डॉक्टरर्सनी बाह्यरुग्ण विभागाच्या बरोबरीनेच शस्त्रक्रियादेखील केल्या. निवासी डॉक्टरांच्या मास बंकचा पहिला दिवस असल्याने फार अडचण आली नाही. पण, उद्याही निवासी डॉक्टर संप सुरू असल्यास काय परिस्थिती उद्भवेल हे सांगणे कठीण असल्याचे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.केईएम रुग्णालयातील सकाळपासून दुपारपर्यंत गर्भवती महिलांची गर्दी जमली होती. अनेकांना मार्डचा संप असल्याचे माहीत नव्हते. यामुळे अनेक गर्भवती महिला ठरल्याप्रमाणे तपासणीसाठी आल्या होत्या. पण, निवासी डॉक्टर कामावर नसल्याने ज्या महिलांना आठवा, नववा महिना चालू आहे, ज्या महिलांना त्रास होत आहे, अशा महिलांची तपासणी करण्यात आली. इतर गर्भवती महिला तास दीड तास ताटकळत बसून होत्या. एलफिन्स्टन रोड स्थानकाजवळ एक मुलगा मोबाइलवर बोलताना खाली पडला. त्याच्या चेहऱ्याला, हाताला जखमा झाल्या. उपचारासाठी त्याला केईएम रुग्णालयात आणले. आपत्कालीन विभागात त्याच्यावर प्राथमिक उपचार झाले. पण, उर्वरित उपचारांसाठी त्याला अर्धा ते एक तास थांबावे लागले. लवकर उपचार न मिळाल्याने या तरुणाच्या नातेवाइकांची अस्वस्थता वाढली होती. सायन रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसून आली. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांना उपचारासाठी सुमारे तासभर थांबावे लागत होते. तरीही शक्य तितक्या जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली. काही शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. नायर रुग्णालयातही अशीच काहीशी परिस्थिती दिसून आली. कूपर रुग्णालयातही रुग्णसेवेवर फारसा परिणाम दिसून आला नाही.रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याची दक्षता१या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रभारी मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीना यांनी गुरुवारी मंत्रालयात बैठक घेऊन या काळात रुग्णसेवा विस्कळीत होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याविषयी सूचना दिल्या. मुख्य सचिवांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) संवाद साधला. मुख्य सचिव म्हणाले, राज्यातील १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि ४ महापालिका वैद्यकीय महाविद्यालांमधील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. २अकोला, धुळे, कोल्हापूर येथील सर्व डॉक्टरांनी कामबंद केले असून पुणे येथील ५० टक्केच डॉक्टर सहभागी झाले आहेत. या आंदोलनाचा रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून ज्या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये आहेत अशा औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, धुळे, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, अकोला, यवतमाळ, नागपूर येथील जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांशी मीना यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.३सुटीवर असलेल्या शासकीय डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून रुग्णालयातील अपघात विभाग २४ तास कार्यरत राहावा, तसेच अत्यावश्यक शस्त्रक्रिया, बाह्यरुग्ण विभाग सुरळीत सुरू राहील अशा पद्धतीने डॉक्टरांच्या ड्युटी लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या सेवा वरिष्ठ डॉक्टरांना सहायक म्हणून देण्याबाबतचा निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला. सायन रुग्णालयात रुग्णांना प्रतिसादमुंबईसह राज्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी सायन रुग्णालयात येतात. ही बाब लक्षात घेऊन आज येथील निवासी डॉक्टर वगळता अन्य डॉक्टरांनी रुग्णांवर योग्य उपचार केले. निवासी डॉक्टरांनीदेखील रुग्णांना जास्त त्रास होणार नाही, याची दखल घेतल्याचे दिसून आले. सकाळी ८पूर्वी निवासी डॉक्टरांनी त्यांच्या हातात असलेली सर्व कामे योग्यरीत्या पार पाडली. त्यामुळे अन्य डॉक्टरांवर त्याचा अधिक ताण पडला नाही. सायन रुग्णालयात दररोज अनेक शस्त्रक्रिया होतात. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे कालपर्यंत निश्चित झालेल्या सर्व शस्त्रक्रिया रुग्णालयात पार पडल्या. सायन रुग्णालयात एकूण ६४९ निवासी डॉक्टर आहेत. रुग्णांना त्रास होऊ नये, यासाठी त्यातील ९३ डॉक्टर कामावर हजर होते. ओपीडीदेखील नेहमीप्रमाणे सुरू होती. शताब्दीत संपच नाही!चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्द परिसरातील रहिवाशांसाठी या परिसरात पालिकेचे शताब्दी हे एकमेव रुग्णालय आहे. या ठिकाणीदेखील दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र आज येथील एकाही डॉक्टराने संपामध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे या रुग्णालयात नेहमीप्रमाणे सर्व रुग्णसेवा सुरळीत होत्या. सरकारशी आम्ही सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक बैठकांमध्ये झालेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून दोनदा मासबंक रद्ददेखील केला. रुग्णसेवा धोक्यात येऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली. तरीही सरकार मार्डला गृहीत धरून आमच्या गंभीर प्रश्नांबाबत कोणतीच स्पष्ट भूमिका घेत नाही. यामुळे आता लेखी स्वरूपात आश्वासन मिळत नाही तोवर मासबंक सुरुच ठेवणार आहोत. - मध्यवर्ती मार्डचे उपाध्यक्ष डॉ. अमित लोमटे