शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

शाळांच्या दुकानदारीमुळे पालकवर्ग त्रस्त

By admin | Published: June 09, 2017 2:33 AM

पनवेल परिसरातील शाळांकडून ठरावीक दुकानातूनच गणवेश अथवा शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे.

अरुणकुमार मेहत्रे। लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल परिसरातील शाळांकडून ठरावीक दुकानातूनच गणवेश अथवा शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. मात्र ही सक्ती पालकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. प्रवेश अर्जासोबतच कोणत्या दुकानातून गणवेशासह शालेय साहित्य घ्यावे, याची माहिती दिली जाते. काही शाळांनी तर दुकानांशी थेट टायअप केल्याचे दिसून येत आहे. काही बड्या शाळांमध्ये तर शालेय साहित्याची दुकाने मांडून त्याद्वारे अवास्तव किमतीत पुस्तके, गणवेश आणि स्टेशनरीची विक्र ी केली जात आहे. शाळांकडून आर्थिक पिळवणूक सुरू असून यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, खारघर त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात अनेक खासगी शिक्षण संस्था आहेत. या शाळांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते. नर्सरीकरिता एका शाळेत ४२ हजारांचे शुल्क यंदा घेण्यात आले. सेंट जोसेफ त्याचबरोबर इतर शाळांमध्ये फी वाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यातच शाळा व्यवस्थापनाकडून कमिशनच्या मोहापायी काही मोजक्याच दुकानदारांकडून शालेय साहित्य, पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्यासाठी सक्ती केली आहे. माध्यमिक शाळांनी गणवेश, इतर शैक्षणिक साहित्याची सक्ती करू नये, असा अध्यादेश मे २०१७ रोजी शिक्षण उपसंचालकांकडून काढण्यात आला. मात्र त्याला चक्क केराची टोपली दाखवत बहुतांश शाळांची मनमानी सुरूच ठेवली आहे. शाळांकडून सुचविण्यात येणाऱ्या ठरावीक दुकानांसह शाळेतील स्टॉल्समधून पालकांना शालेय साहित्याचा सेट करून तो मनमानी किमतीला विक्र ी केला जात आहे. ज्या वस्तूंची विद्यार्थ्यांना वर्षभर गरजही भासणार नाही, अशा वस्तूंची भरही या सेटमध्ये घातली जात आहे. >नियम केवळ कागदावरचशाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश अथवा अन्य शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा शाळा वा व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या विशिष्ट दुकानातूनच खरेदीची सक्ती विद्यार्थी किंवा पालकांना करता येणार नाही हा नियम आहे, मात्र तो फक्त कागदावरच असल्याने पालकवर्ग त्रस्त आहे.