शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
4
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
5
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
6
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
7
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
8
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
9
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
10
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
11
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
12
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
13
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
14
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
15
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
17
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
18
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
19
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
20
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

पटोलेंचा भाजपाला ‘रामराम’, गुजरातमध्ये भाजपाविरोधात प्रचार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 5:52 AM

गुजरात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच भाजपाचे बंडखोर नेते नाना पटोले यांनी शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेटही घेतली.

नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच भाजपाचे बंडखोर नेते नाना पटोले यांनी शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेटही घेतली. नाना पटोले गुजरातमध्ये भाजपाविरोधी प्रचार करायला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.पटोले गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत होते. त्यांनी शुक्रवारी दुपारी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे राजीनामा सादर केला. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी शेतकºयांचे प्रश्न सोडवण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरल्याची तोफ डागली.राजीव सातव यांची मध्यस्थीपटोले यांनी नोव्हेंबरमध्ये राहुल गांधी तसेच अहमद पटेल यांची भेट घेतल्याची चर्चा होती. राजीनामा सादर करण्यापूर्वी पटोले यांनी काँग्रेसचे खा. राजीव सातव यांची भेट घेतली. सातव राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करून ते विजयी झाले होते. विदर्भात ते ओबीसींचे मोठे नेते मानले जातात. पटोले यांच्या राजीनाम्यामुळे विदर्भात भाजपाला धक्का बसण्याची शक्यता आहे.पंतप्रधान मोदींची भूमिका लोकशाहीला शोभणारी नाहीही खुर्ची माझी नसून, लोकांची आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी आलो होतो. मात्र, इथे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. पंतप्रधानांची भूमिका लोकशाहीला शोभणारी नाही, त्यामुळे आता लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी लढू. जीएसटी, नोटाबंदीनंतर युवकांच्या नोकºया गेल्या. बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारकडून पावले उचलली गेली नाहीत. मोदींविषयी अनेक मंत्री, खासदारांमध्ये खदखद आहे. त्यातील अनेक जण राजीनामा देतील. - नाना पटोलेकाँग्रेस हे पटोलेंचे घरचकाँगे्रस हे नाना पटोलेंचे घरच आहे. त्यांचे घरात कधीही स्वागत आहे. मी त्यांचे अभिनंदन करायला आलो आहे. - मोहन प्रकाश, काँग्रेस प्रभारी, महाराष्ट्रओबीसी नेता गमावलाहिवाळी अधिवेशनात इतर मागासवर्गीय आयोगास घटनात्मक दर्जा देणारे विधेयक येणार असताना ओबीसी खासदाराने राजीनामा दिल्याने भाजपामध्ये अस्वस्थता आहे. ओबीसी नेत्यांना मिळणारी वागणूक, शेतकरी समस्या, बेरोजगारी, भाजपाध्यक्ष अमित शहा व मोदी यांची कार्यशैली यावर पटोले गुजरातमध्ये प्रचार करू शकतात.गेल्या वर्षी खासदाराच्या बैठकीत पंतप्रधानांसमोर शेतकºयांचे प्रश्न उपस्थित केल्याने पटोलेंची खरडपट्टी काढण्यात आली होती. तेव्हापासून ते नाराज होते..

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017