मोहोळ (जि. सोलापूर) : एखादी महिला उच्चपदावर पोहोचताच सर्वाधिक रुबाब वाढतो, तो त्यांच्या पतीराजांचाच. त्यांच्याकडून अनेकदा शासकीय कामकाजात ढवळाढवळ केली जाते तर, कधी अधिकाऱ्यांना दमदाटी देखील ते करतात. यामुळे त्यांच्या पत्नी अडचणीत येतात; ‘कुठे बोलायची सोय नाही,’ अशी त्यांची पंचाईत होते. याच पार्श्वभूमीवर मोहोळ तालुका पंचायत समितीने अशा ‘नवरोबां’नाच कार्यालयात येण्यास मज्जाव करणारा ठराव केला.ग्रामपंचायतीपासून अगदी विधिमंडळापर्यंत अनेकदा लोकप्रतिनिधी महिलांचे पतीच संबंधित कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करीत असतात. काही वेळेस पत्नीच्या पदाचा फायदा घेत एखाद्यावर दडपण आणतात किंवा ‘अर्थ’पूर्ण व्यवहारासाठी मध्यस्थाची भूमिकाही वठवतात. त्यांची ही ढवळाढवळ त्या महिलेसह शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेकदा भोवते देखील. पण अत्यंत बेपर्वाईने त्यांच्या या कुरापती सुरूच असतात.महिला पदाधिकाऱ्यांच्या पतीराजांनी अथवा नातेवाइकांनी कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देऊ नये़ शासकीय कामात हस्तक्षेप करू नये़ असे शासनाचे आदेश असतानाही महिला पदाधिकाऱ्यांचे पतीच अधिकार गाजवितात़
पंचायत समितीत पतीराजांना प्रवेशबंदी !
By admin | Published: June 25, 2015 12:56 AM