शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

पवार-राणे भेटीत राजकीय साखरपेरणी, ‘स्वाभिमान’ महाआघाडीत दाखल होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 4:26 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची भेट घेतल्याने तर्कविर्तक लढविण्यात येत आहेत.

कणकवली (जि.सिंधुदुर्ग) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची भेट घेतल्याने तर्कविर्तक लढविण्यात येत आहेत. एनडीएत असलेला राणे यांचा स्वाभिमान पक्ष भविष्यात महाआघाडीत दाखल होण्याच्या दृष्टीने ही साखरपेरणी असल्याची चर्चा आहे.शरद पवार हे गेले दोन दिवस सहकुटूंब सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासमवेत नातू रोहित, पार्थ व हर्ष हेही आहेत. सोमवारी दुपारी दोन वाजता ते राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानी दाखल झाले. यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यासह स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस आदी पदाधिकारी उपस्थित होते. उभय नेत्यांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. मात्र चर्चेचा तपशील कळू शकला नाही.या भेटीबाबत विचारले असता, पवार म्हणाले, मी सिंधुदुर्गात आलो होतो. नारायण राणे यांनी मला दूरध्वनी केला होता. त्यामुळे मुंबईला जाता जाता त्यांच्या निवासस्थानी मी सदिच्छा भेट दिली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. कारण तशी चर्चा करण्यासारखा विषय माझ्याकडेही आणि राणेंकडेही नाही. ही केवळ सदिच्छा भेटच होती. राणे यांनी या भेटीबाबत मौन बाळगले असले तरी त्यांचे चिरंजीव नीतेश राणे यांनी, महाराष्ट्राचे राजकारण नारायण राणेंशिवाय होऊ शकत नाही, असे सूचक विधान केले आहे.राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर स्वाभिमान पक्ष काढला. हा पक्ष एनडीएत सामील झाल्यानंतर त्यांची भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर वर्णी लागली. राणेंना पुन्हा सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवायची असेल, तर आधी हा मतदारसंघ शिवसेनेकडून सोडवून घ्यावा लागेल. सेना आणि राणेंचे एकूण ‘मधूर’ संबंध बघता ती शक्यता कमीच दिसते. त्यामुळे पवारांच्या भेटीतून राणेंनी वेगळा पर्याय शोधला असल्याचे मानले जात आहे.>राणे हे योग्यच निर्णय घेतील : चंद्रकांत पाटीलस्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे हे हुशार राजकारणी आहेत; त्यामुळे जरी ते राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले असले, तरी ते योग्य निर्णय घेतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे व्यक्त केला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Sharad Pawarशरद पवार