बारामती : धनगरांचे प्रवक्तेपद शरद पवारांनी घेऊ नये. नरेंद्र मोदींकडून हा प्रश्न सोडवून घेण्यास आम्ही सक्षम आहोत. मोदींनी पवारांची स्तुती केली असली, तरी पुढील लोकसभेला ‘बारामती पवारमुक्त करा,’ असेच आवाहन मोदी पुन्हा करतील, असा दावा महादेव जानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.बारामतीच्या सभेत पवारांनी धनगर आरक्षणाच्या प्रश्नाकडे मोदींचे लक्ष वेधले. त्यावर जानकर म्हणाले, धनगरांबाबत पवारांची नियत साफ नाही. आजवर त्यांच्याच पक्षाचे पंतप्रधान असताना त्यांनी हे आरक्षण का दिले नाही? आता आमच्या मित्रपक्षाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे हा प्रश्न कसा सोडवायचा, ते आम्ही ठरवू. पवारांनी या भानगडीत पडून उगाच लुडबुड करू नये. (प्रतिनिधी)
पवारांनी धनगरांचे प्रवक्तेपद घेऊ नये -महादेव जानकर
By admin | Published: February 16, 2015 3:23 AM