हृद्य सत्कार : सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला कृतज्ञता सोहळामुंबई : छोट्यातल्या छोट्या माणसाला मोठ्यातली मोठी संधी मिळणे हे लोकशाहीचे बलस्थान आहे. अशा सशक्त लोकशाहीच्या सन्मानासाठीच उरलेले आयुष्य वेचण्याची ग्वाही शरद पवार यांनी अमृतमहोत्सवी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा पंचाहत्तरीनिमित्त मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये सर्वपक्षीय नेते, कलाजगतातील दिग्गज, उद्योजक, क्रीडाजगतातील मान्यवर आणि चाहत्यांच्या उपस्थितीत हृद्य सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्राचे आधारवड अशा सन्मानजनक बिरुदाने पवार यांना गौरविणाऱ्या समारंभात त्यांच्या दीर्घ राजकीय-सामाजिक कारकिर्दीतील ७५ महत्त्वाच्या घटना व टप्प्यांचा उल्लेख असलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही झाले.राष्ट्रपती व्हा - राहुल बजाजशरद पवार म्हणजे या देशाला न लाभलेला सर्वोत्तम पंतप्रधान असल्याचे विधान उद्योजक राहुल बजाज यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. पंतप्रधान पद नाही तर, शरद पवारांनी आता थेट राष्ट्रपती व्हायला हवे.जीवन एकांगी असून चालणार नाही. उद्योग-व्यवसाय करतानाही समतोल जीवन जगता यायला हवे. मी राजकारणात असलो तरी कला, साहित्य, संगीताचा आस्वाद मी घेतो, असे एका भेटीत शरद पवारांनी आपणास सांगितले. त्यांच्यामुळेच आयुष्यात समतोल साधू शकलो.- मुकेश अंबानी, रिलायन्सचे प्रमुखपवार हे अस्सल तेल लावलेले पैलवान आहेत. ते कोणाच्या हाताला लागत नाहीत असे अनेकदा ऐकले होते. त्याचा आज अनुभव येतोय. सर्व विषयांत गती असणारे पवारांचे अष्टावधानी नेतृत्व ही दैवी कृपा आहे आणि ते नेतृत्व महाराष्ट्राला लाभले, हे आपले भाग्य आहे. - राज ठाकरे, मनसे अध्यक्षपवारांनी अनेकांना जगवले आणि जगायलाही शिकवले. युवा राजकारण्यांसाठी ते चालते-बोलते एक विद्यापीठ आहेत. - नारायण राणे, माजी मुख्यमंत्रीपवार म्हणजे लोकप्रतिनीधींचा आदर्श. प्रत्येक पंतप्रधानाने आपल्या कार्यकाळात त्यांचे सहाय्य घेतले आहे. - सी. विद्यासागर राव, राज्यपाल, महाराष्ट्रचंद्राचे चांदणे जसे आपल्या सोबत असते, तसे शरदाचे हे चांदणे राजकीय जीवनात अनेकांच्या कायम सोबत राहिले. - श्रीनिवास पाटील, राज्यपाल, सिक्कीम
पवार हे ‘आधारवड’
By admin | Published: December 13, 2015 3:12 AM