मुख्यमंत्री शरद पवार?: राष्ट्रवादीमध्ये मतप्रवाह, आज ठरणार भूमिका
मुंबई : ‘अब की बार शरद पवार’ असा नारा देऊन स्वबळावर निवडणूक लढवायची, असा मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून, उद्या मुंबई येथे होणा:या पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात विधानसभा निवडणुकीची रणनीती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विधानसभेत पक्षाची इभ्रत वाचवायची असेल, तर शरद पवारांशिवाय पर्याय नाही, असा सूर पक्षात आहे. विधिमंडळातील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या दालनात सगळीकडे सध्या हीच चर्चा रंगत आहे. आमदार आणि पदाधिका:यांच्या मते, पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढविली तर आम्हाला काँग्रेसची गरज नाही. शंभरावर जागा आम्ही जिंकू. 1999मध्ये निवडणूक निकालानंतर जशी काँग्रेसशी आघाडी केली होती, तशी याहीवेळी करता येईल. पण मुख्यमंत्रिपदावर आमचाच दावा असेल.
पवार यांनी काल दिवसभर राज्यातील 29 जिल्ह्यांमधील प्रमुख नेत्यांशी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा केली. त्या वेळी पुण्यासह काही जिल्ह्यांमधील नेत्यांनी पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात परतावे, अशी गळ त्यांना घातली. पवार सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. तथापि, पक्षाचे महाराष्ट्रातून 4 आणि इतर राज्यातून 2 असे 6 खासदार दिल्लीत निवडून गेले आहेत. लोकसभेत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता पवारांसारख्या नेत्यांची दिल्लीत कुठलीही भूमिका राहिलेली नाही.
पवार आज काय बोलणार?
च्राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम रविवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात होणार असून, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगुल फुंकले जाणार आहे.
च्या वेळी पक्षाध्यक्ष शरद पवार काय भूमिका जाहीर करतात याबाबत उत्सुकता आहे. पवारांनी महाराष्ट्रात परतावे, असा आग्रह पक्षाकडून होऊ शकतो.
च्उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेली नाही. मात्र आता काकाच परत आले तर त्यांच्या इच्छेवर पाणी फेरले जाणार आहे.
च्पवार यांनी महाराष्ट्रात परतून मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह पक्षजन करीत असल्याचे पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी मान्य केले. ते म्हणाले, पवार यांच्या दीर्घ अनुभवाचा, राज्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा फायदा पुन्हा राज्याला व्हावा, असे कार्यकत्र्याना वाटते.