शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

पवारांची अवस्था : 'तुम मुझे दोस्तो से बचाव, मै दुश्मनो से निपट लुंगा'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 12:46 PM

१९६० नंतरच्या राजकारणात शरद पवार यांनी पुरोगामीत्वाची कास धरून जातीवादाला विरोध करणार भूमिका घेतली. त्याचबरोबर आपले मानस पिता यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणात ज्या त्रुटी राहिल्या, त्या त्रुटी दूर करून ठोशास ठोसा, मुत्सद्दीपणा, पाडापाडी अशा प्रकारचे तत्व त्यांनी कृतीत आणले. परंतु, यात पुरोगामीत्वापासून पवारांनी कधीही फारकत घेतली नाही.

-राजा मानेखरंच खुद्द शरद पवारच आपले खंदे शिलेदार भाजप-शिवसेनेच्या तंबूत घडताहेत ?...नात्या-गोत्यांच्या पलिकडचे खरे शरद पवार आपल्याला माहितच नाहीत...कुणी फासावर लटकवायला निघाले तरी मी साहेबांची साथ सोडणार नाही, असा बाणा पवारांच्या आशीर्वादाने "सम्राट" बनलेले का दाखवत नाहीत?..तुम मुझे दोस्तोसे बचाव, दुश्मनोसे मै खुद निपट लुंगा...अशी पवारांची अवस्था झालीय ?..असे असंख्य प्रश्न राष्ट्रवादीतून सुरू 'आउटगोइंग'मुळे उपस्थित होत आहे.

महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. सध्याच्या घडामोडी या प्रामुख्याने शरद पवार या व्यक्तीमत्वाभवतीच फिरत आहेत. खर तर शरद पवार म्हणजे राजकारणातील रजनीकांत. देशात असो वा महाराष्ट्रात काहीही घडलं की, त्यात पवारांचा हात असावा, अशा प्रकारचं सूत्र आपण अनेक वर्षांपासून मांडत आलो आहोत. सध्याच्या घडामोडींवरूनच अशाच प्रकारची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. खुद्द पवार साहेबच राष्ट्रवादीतील नेत्यांना भाजप आणि शिवसेनेत पाठवत असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.

शरद पवार यांच्याविषयीच्या या चर्चांनी सोशल मीडियावर मनोरंजन होत असलं तर खुद्द पवार यातून व्यथीत झाल्याचे दिसून येते. पत्रकारांवर चिडणे असो वा त्यांच्याबद्दल येत असलेल्या बातम्या असोत यामुळे पवार खरच चिडचिडे झाले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवार म्हणदे देशाच्या राजकारणातील मोठं नाव आहे. मुळातच पवार यांची जडणघडण सत्यशोधक आणि पुरोगामी कुटुंबात झाली आहे. त्यामुळे पत्रकाराने नातेवाईकांवरून विचारलेल्या प्रश्नामुळे चिडावं, असं त्यांचं व्यक्तीमत्व असल्याचं मान्य करणे कठीणच आहे.याची उकल आपल्याला इतिहासात मिळेल. १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोमात होती. या चळवळीत पवार कुटुंबीय देखील सक्रिय होतं. त्यावेळी बारामती मतदार संघातून केशवराव जेधे यांच्यासारखा नेता विजयी झाला होता. दुर्दैवाने जेधेंचं निधन झालं. त्यानंतर जेधेंचे चिरंजीव १९६० मध्ये बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तोपर्यंत शरद पवार काँग्रेसच्या विचारधारेत सहभागी झाले होते. त्याचवेळी १९६० च्या निवडणुकीत शरद पवार यांचे बंधु वसंतराव पवार संयुक्त महाराष्ट्र समितीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे जेधे होते. त्यावेळी काँग्रेसच्या विचारांनी भारावलेल्या पवारांनी भावाचा प्रचार न करता काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. या गोष्टीची दखल घेणे आवश्यक आहे. या घटनेवरून स्पष्ट होते की, शरद पवार सुरुवातीच्या काळापासूनच नातीगोती आणि पक्षीय राजकारणाकडे त्रयस्तपणे पाहात आले आहेत.सध्यातरी राष्ट्रवादी पक्षातून जाणाऱ्यांना थांबवायला पवार तयार नाहीत. जे जात आहेत, त्यांना परवानगी देण्याऐवजी ते 'नो कॉमेंट' म्हणून वेळ मारून नेत आहेत. मात्र शरद पवार खरच आपले कार्यकर्ते, नेते आणि नातलग यांना भाजपमध्ये पाठवत असतील तर येत्या काळात राष्ट्रवादी पक्ष खऱ्या अर्थानं भाजपमध्ये विलीन झाला असा तार्किक मुद्दा समोर येऊ शकतो.१९६० नंतरच्या राजकारणात शरद पवार यांनी पुरोगामीत्वाची कास धरून जातीवादाला विरोध करणार भूमिका घेतली. त्याचबरोबर आपले मानस पिता यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणात ज्या त्रुटी राहिल्या, त्या त्रुटी दूर करून ठोशास ठोसा, मुत्सद्दीपणा, पाडापाडी अशा प्रकारचे तत्व त्यांनी कृतीत आणले. परंतु, यात पुरोगामीत्वापासून पवारांनी कधीही फारकत घेतली नाही. किंबहुना मराठवाडा नामविस्ताराचा मुद्दा किंवा महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण देण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतले.राजकारण करताना शरद पवार कधीही भावनिक झाल्याचे ऐकीवात नाही. गरज असेल तिथे आपले मोहरे पुढे करून पाडापाडीचं राजकारण करण्यासाठी त्यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या १९६० नंतरच्या राजकीय उलथापालथीत शरद पवार यशवंतराव चव्हाणांसोबत देखील राहिले नव्हते. त्यावेळी यशवंतरावजी काँग्रेसच्या वाटेवर होते. परंतु, पवार यांनी तेंव्हा स्वतंत्र भूमिका घेतली होती. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्राची अस्मिता आणि दिल्लीचे राजकारण अशा स्थितीत पवारांनी आपलं उपद्रवमुल्य कायम राखून बस्तान बसवले होते.पवारांनी निवडणुकीच्या राजकारणात कधीही पराभव पाहिला नाही. परंतु, काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना नामुष्कीचा पराभव स्वीकारावा लागला होता. ही गोष्टी साधारण १९९७-९८ मधील होती. काँग्रेसमधील आपलं उपद्रव मुल्य घटत असल्याचे लक्षात आल्यानंतर पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यांनी तारिक अन्वर, पी.ए. संगमा यांना सोबत घेत सोनिया गांधी परदेशी असल्याचा मुद्दा जनतेसमोर ठेवला. तरी देखील पवार कायमच राष्ट्रीय राजकारणात पावरफुल ठरले. त्यांच्यामागे खासदार किती हा मुद्दा कधी चर्चिला गेला नाही. उलट पवार आपल्यासोबत आहेत का, हे महत्त्वाचे वाटत होते.राज्याच्या राजकारणात शरद पवारांनी सोयीस्कररित्या सोशल इंजियनिरींग केलं. अनेकांना पदं दिली, शिक्षण संस्था, साखर कारखाने दिली. प्रत्येक जातीला सोबत घेत अनेकांना संधी दिली. यामध्ये रामदास आठवले असतील, मधुकर पिचड असतील, छगन भुजबळ किंवा अरुण गुजराथी असतील. आज यापैकी अनेक नेते त्यांना सोडून जात आहेत. परंतु, वेळप्रसंगी स्वत:च्या भावाचा प्रचार न करणारे पवार पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना तुम्ही थांबा कसं म्हणतील हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे.२०१४ नंतर देशाच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. संघ परिवाराने मागील ३० वर्षांपासून केलेल्या कामाचे फळ भाजपला २०१४ मध्ये मिळाले. हे फळ पदरात पाडून घेण्याचं श्रेय प्रामुख्याने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कार्यपद्धतीला आणि कार्यशैलीला जातं. परंतु, मजबूत विरोधक असणे हा तार्किक मुद्दाही यानिमित्ताने समोर येतो.तुम मुझे दोस्तो से बचाव,मै दुश्मनो से निपट लुंगाराष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतरावर वरील शेर चपखल बसतो. शरद पवारांची अवस्था अशीच काहीशी झाली आहे. यातून दोन पर्याय पवारांसमोर येतात. पहिला म्हणजे पक्षाची नव्याने बांधणी करणे. मात्र वाढत्या वयामुळे पवारांना पक्षबांधणी नव्याने करणे तितकेसे सोप नाही. तर दुसरा पर्याय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये किंवा भाजपमध्ये विलीन करणे. यापैकी दुसरा पर्याय हास्यास्पद वाटू शकतो. परंतु, राजकीय तर्कशास्त्र जो निष्कर्ष काढतं ते आजतरी हेच आहे. त्याचं कारण म्हणजे, लाभार्थ्यांची पिलावळ पवारांपासून दूर जाऊ इच्छित आहे. त्याचवेळी महाराष्ट्राची अस्मिता दिल्ली दरबारी जतन करणारा नेता अडचणीत आल्याची खंतही मराठी माणसाला वाटेत असेल यात दुमत असू शकत नाही.