लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद २६ जून रोजी असून, त्यापूर्वी शिक्षकांचे वेतन अदा करावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने राज्य शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्याचे शिक्षण संचालक यांना दिल्याची माहिती संघटनेचे मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी दिली.बोरनारे म्हणाले की, राज्यातील प्लॅन व नॉनप्लॅनमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतरांचे जून महिन्याचे वेतन विशेष बाब म्हणून एक आठवडा लवकर देण्याची विनंती सरकारकडे केली आहे. यापूवीर्ही शासनाने सणावाराला लवकर वेतन दिले आहे. त्याचप्रकारे रमजान ईदनिमित्त एका आठवड्याआधी जून महिन्याचे वेतन शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली आहे.
‘शिक्षकांना ईदपूर्वी जूनचे वेतन द्या!’
By admin | Published: June 12, 2017 2:36 AM