मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या ५५ टक्के एवढ्या रेकॉर्डब्रेक मतदानानंतर, राजकीय पक्षांचा बुधवार ‘शांतता, तणाव आणि काहीसा उत्साहा’त गेला. विशेषत: गेल्या पंधरा दिवसांपासून निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी बुधवारची निवांत सकाळ आपल्या कुटुंबासाठी राखून ठेवली. त्यानंतर, सुरू झालेल्या राजकीय चर्चेमुळे तापलेली दुपार सायंकाळपर्यंत ‘गरम’च असल्याचे चित्र होते.मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचे मतदान संपते, तोच वृत्तवाहिन्यांसह निवडणुकीशी संबंधित घटकांनी ‘एक्झिट पोल’ जाहीर करणे सुरू केले. शिवसेना आणि भाजपा ‘एक्झिट पोल’मध्ये आघाडीवर असल्याचे चित्र निदर्शनास येताच, कार्यकर्त्यांमध्ये काहीसा उत्साह संचारला. मात्र, असे असले, तरीदेखील निवडणुकीचे प्रत्यक्ष निकाल गुरुवारी हाती येणार असल्याने बुधवारी सकाळपासूनच मुंबापुरीत शांतता होती. शिवसेनेच्या शाखांबाहेरील तुरळक गर्दी वगळता, भायखळा, गिरगाव, लालबाग, वरळी, दादर, सायन, धारावी, वांद्रे, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड आणि सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी, बोरीवली आणि जोगेश्वरी येथील पक्षीय कार्यालयांबाहेर फारशी गर्दी नव्हती. दुपारी तर पक्षीय कार्यालये ओसच पडली होती.राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सायंकाळनंतर मात्र, कार्यालयांच्या भेटीवर जोर दिला. विशेषत: पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पक्षीय कार्यालयात सायंकाळी कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेट घेत, गुरुवारचे नियोजनही केले. सकाळ काहीशी ओस गेली असली, तरी तापलेल्या दुपारनंतर सायंकाळी राजकीय पक्षांची कार्यालये कार्यकर्त्यांच्या गर्दीसह राजकीय चर्चेने ओसंडून वाहात होती.दरम्यान, मनसेने शिवसेनेकडून हिसकावून घेतलेले दादर सेना परत मिळवणार का, घाटकोपर येथील सोमय्यांच्या सीटचे काय होणार, गिरगावात पुरोहित प्रतिष्ठा जपणार का? अशा चर्चांसह मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील मोक्याच्या जागा सेना जिंकणार की भाजपा? असे चर्चेचे फडही रंगले. (प्रतिनिधी)शांतता, मतमोजणी सुरू आहे...२२७ प्रभागातील तब्बल २ हजार २७५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल्यानंतर, गुरुवारच्या मतमोजणीदिवशी निकाल ऐकण्यासाठीची शांतता सर्वत्रच पाहायला मिळणार आहे. अपेक्षित आणि अनपेक्षित निकाल हाती लागल्यानंतर, हिरमोडीसह विजयाचे नगारे वाजणार असले, तरी श्रीमंत महापालिकेवर सत्ता कोणाची येणार? हे पाहणेही तेवढेच औत्सुक्याचे ठरणार आहे.या लढतींकडे मुंबईचे लक्षप्रभाग क्रमांक ९ : मोहन मिठबांवकर (भाजपा)प्रभाग क्रमांक ११ : रिद्धी खुरसंगे (शिवसेना) विरुद्ध प्रकाश दरेकर (भाजपा)प्रभाग क्रमांक ५० : दीपक ठाकूर (भाजपा)प्रभाग क्रमांक ६० : यशोधर फणसे (शिवसेना) विरुद्ध ज्योत्स्ना दिघे (काँग्रेस)प्रभाग क्रमांक ६१ : राजुल पटेल (शिवसेना)प्रभाग क्रमांक ६८ : काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले देवेंद्र आंबेरकर प्रभाग क्रमांक ७४ : उज्ज्वला मोडक (भाजपा)प्रभाग क्रमांक ७७ : अनंत नर (शिवसेना)प्रभाग क्रमांक ८५ : ज्योती अळवणी (भाजपा)प्रभाग क्रमांक १०३ : मनोज कोटक (भाजपा)प्रभाग क्रमांक १०४ : प्रकाश गंगाधरे (भाजपा)प्रभाग क्रमांक १०८ : नील सोमय्या (भाजपा)प्रभाग क्रमांक ११८ : भाजपाचे माजी आमदार मंगेश सांगळे प्रभाग क्रमांक १२७ : रितू तावडे (भाजपा)प्रभाग क्रमांक १३१ : भालचंद्र शिरसाट (भाजपा) विरुद्ध राखी जाधव (राष्ट्रवादी)प्रभाग क्रमांक १३२ : कोट्यधीश उमेदवार पराग शहा (भाजपा) विरुद्ध प्रवीण छेडा (काँग्रेस)प्रभाग क्रमांक १४४ : कामिनी शेवाळे (शिवसेना)प्रभाग क्रमांक १६३ : दिलीप लांडे (मनसे)प्रभाग क्रमांक १६६ : माजी आमदार राजहंस सिंह यांचा मुलगा नितेश सिंह प्रभाग क्रमांक १६८ : अनुराधा पेडणेकर (शिवसेना) विरुद्ध सईदा खान (राष्ट्रवादी)प्रभाग क्रमांक १७९ : तृष्णा विश्वासराव (शिवसेना)प्रभाग क्रमांक १९१ : विशाखा राऊत (शिवसेना), तेजस्विनी जाधव (भाजपा), स्वप्ना देशपांडे (मनसे)प्रभाग क्रमांक १९४ : समाधान सरवणकर (शिवसेना) विरुद्ध संतोष धुरी (मनसे)प्रभाग क्रमांक १९८ : महापौर स्नेहल आंबेकर (शिवसेना)प्रभाग क्रमांक १९९ : किशोरी पेडणेकर (शिवसेना)प्रभाग क्रमांक २०२ : माजी महापौर श्रद्धा जाधव (शिवसेना)प्रभाग क्रमांक २०३ : तेजस्विनी अंबोले (भाजपा)प्रभाग क्रमांक २१२ : गीता गवळी (अखिल भारतीय सेना)प्रभाग क्रमांक २२१ : आकाश पुरोहित (भाजपा)प्रभाग क्रमांक २२७ : मकरंद नार्वेकर (भाजपा)खलबते आणि चर्चामुंबई शहर आणि उपनगरातील अर्ध्याधिक प्रभागांनी मतदानाची पन्नाशी गाठली आहे. काही प्रभागांत तर साठ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे. मागील कित्येक वर्षांच्या तुलनेत मतदानाचा हा आकडा वाढीव आहे आणि हा वाढीव टक्का ‘भाजपा’च्या हिताचा ठरेल, अशा राजकीय चर्चांना ठिकठिकाणी उधाण आले होते. च्मात्र, वृत्तवाहिन्यांच्या ‘एक्झिट पोल’ने आपले पारडे शिवसेनेकडे झुकवल्याने शिवसैनिकांमध्येही उत्साह संचारला. परिणामी, शिवसेनेसह भाजपाच्या गोटात दिवसभर शांतता असली, तरी हीच शांतता गुरुवारी उत्साहासह आनंदात परावर्तित होताना दिसणार आहे.
शांतता, तणाव आणि उत्साह...
By admin | Published: February 23, 2017 4:59 AM