शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

शेतकऱ्यांसाठी शेकापचा धडक मोर्चा

By admin | Published: June 06, 2017 2:36 AM

सरकारकडे गाऱ्हाणे घालूनदेखील सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : वारंवार सरकारकडे गाऱ्हाणे घालूनदेखील सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही. शासनापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांपुढे अखेर संप पुकारण्याखेरीज कोणताही मार्ग नसल्याने शेतकऱ्याने संपाचे शस्त्र उगारले. शेतकऱ्यांचा कैवारी असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने नेहमीच शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व सरकारला वठणीवर आणण्यासाठी शेकाप रस्त्यावर उतरला आहे. जागतिक पर्यावरण दिन ५ जून रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर सकाळी ११ वाजता शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. अलिबाग येथील मोर्चाअंती शेकाप नेत्या व माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनी तहसीलदार प्रकाश संकपाळ यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन दिले. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयाजवळून मोर्चाला सुरु वात झाली. या वेळी जि. प. माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा सहचिटणीस शंकरराव म्हात्रे, अनंतराव देशमुख, जि. प. सदस्या चित्रा पाटील, दिलीप भोईर, उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, जिल्हा कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. परेश देशमुख, नगरसेवक अ‍ॅड. गौतम पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महागाई नियंत्रणाच्या नावाखाली सरकार शेतमालाचे भाव वारंवार घसरवत आहे. यामुळे शेतकऱ्यांबरोबर सामान्य करदात्याला वेठीला धरण्यात येत आहे. भाजपाचे प्रमुख देणगीदार प्रामुख्याने शेतमाल पुरवठा व्यवस्थेतील व्यापारी, दलाल, प्रक्रि यादार असल्याने त्यांच्यावर सवलतींची मेहेरबानी करून शेतकरी वर्गाला कर्जाच्या खाईत ढकलले जात आहे. सरकारने त्वरित शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, सध्याच्या शेती व्यवसायाची डबघाईची परिस्थिती ओळखून शेती व ग्रामविकासासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, शेतीमालाचे हमीभाव निश्चित करताना शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची ताबडतोब अंमलबजावणी करून शेती व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी पाणीपुरवठ्याचे समन्यायी नियोजन करावे. तसेच शेतीशी निगडित असलेल्या ग्रामीण रोजगार संधीची निर्मिती करावी, अशा शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी या वेळी सांगितले.>भाजीची टंचाई, भाजीचे भाव गगनाला भिडलेशेतकरी संपावर गेल्याने राज्यात ठिकठिकाणी भाजीपाला, दूध व अन्य जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी, शेतमालाला कायमस्वरूपी योग्य भाव, निवृत्तीवेतन, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संपाला सुरु वात केली आहे. भाजीपाला नसल्याने शहरात भाजी मिळणे कठीण झाले आहे. तर उपलब्ध भाजीचा भाव गगनाला भिडल्याने या संपाचा फटका सर्वसामान्य जनतेलाही बसला आहे.भाजीचा रोजगार ठप्पबाजारात भाजी उपलब्ध होत नसल्याने स्थानिक महिलांचा रोजगार ठप्प झाला आहे. जिल्ह्यातील महिला सकाळी घाऊक पद्धतीने भाजीपाला खरेदी करून दिवसभर भाजीविक्र ी करून उदरनिर्वाह करतात. मात्र, भाजीपाला उपलब्ध नसल्याने त्यांना घरी बसावे लागत आहे. त्यामुळे शासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेकांच्या पदरी उपासमार आली असल्याचे चित्र दिसून येत आहे.बंदला उत्स्फूर्त प्रतिसादशेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक शहरातील कपडे, किराणा माल, ज्वेलर्स, मोबाइल आदी बाजारपेठेतील दुकाने बंद होती. मात्र, रु ग्णांचे हाल होऊ नये, याकरिता औषधांची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून दुकानदार, व्यापारी वर्गाने एकदिवसीय बंद पुकारल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. >शेतकरी संपाला शेकापचा पाठिंबाकर्जत : राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाला शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला आहे. सोमवारी सकाळी ११.३० वाजता तहसीलदार यांना निवेदन देऊन कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाने शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे.शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विलास थोरवे, जिल्हा परिषद सदस्य व तालुका चिटणीस सुदाम पेमारे, पंचायत समिती माजी उपसभापती अशोक पाटील, प्रकाश फराट, जिकरिया बुबेरे, सुधीर कांबळे, बाळाराम ऐनकर आदी कार्यकर्त्यांनी तहसीलदार अविनाश कोष्टी यांना निवेदन सादर केले.