शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
3
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
4
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
8
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
9
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
10
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
11
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
12
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
13
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
14
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
15
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
16
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
17
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
18
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

चोटी गँग ! कल्याणमध्येही विद्यार्थिनीला बेशुद्ध करुन कापले केस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 6:11 PM

उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ चोटी गँग मुंबईतही आल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कल्याण-शहराच्या पूर्व भागातील गोविंदवाडी परिसरात राहणा-या 14 वर्षीय शाळकरी मुलीचे शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास केस कापण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

कल्याण, दि. 19 -उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ चोटी गँग मुंबईतही आल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कल्याण-शहराच्या पूर्व भागातील गोविंदवाडी परिसरात राहणा-या 14 वर्षीय शाळकरी मुलीचे शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास केस कापण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या शाळकरी मुलीचे नाव सपना गुप्ता आहे. ती इयत्ता आठवीच्या वर्गात शिकते आहे. शुक्रवारी रात्री ती घरातील एक खोलीत अभ्यास करीत होती. तेव्हा ती अचानक बेशुद्ध पडली. ती बेशुद्ध पडल्याने तिच्या भावाचे तिच्याकडे लक्ष्य गेले. त्यावेळी तिचे केस कापण्यात आल्याचे त्याच्या निदर्शनास आले.  त्याने तिच्या तोंडावर पाणी मारुन तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेमुळे गोविंदवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी डोंबिवलीतील पिसवली व कल्याण मलंग रोडवर केस कापण्याचे दोन घटना घडलेल्या आहे. केस कापण्याच्या घटनांचे सत्र कल्याणमध्ये सुरुच आहे. 

‘चोटी गँग’ आता मुंबईतही

दरम्यान,  उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ चोटी गँग मुंबईतही आल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रात्रीच्या अंधारात मुंबईतील तीन महिलांचे केस कापण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.भायखळा येथील मदनपुरा परिसरात फरिदा शेख (३९) मुलीसोबत राहतात. १२ आॅगस्ट रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्या घरात झोपल्या असताना अंगावरून काहीतरी सळसळत जात असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी लाइट लावून पाहताच त्यांचे अर्धे केस कोणीतरी कापल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड करताच शेजारी राहत असलेला अकबर हा भाऊ धावून आला. त्याने घराबाहेर आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे कोणीच नव्हते. या प्रकरणी अकबरने आग्रीपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.अशीच एक घटना १५ ऑगस्टला घडली. आग्रीपाडा येथील कालापाणी परिसरात रोशन खातुम (४०) राहतात. त्या घराबोहर झोपल्या होत्या. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना जाग आली. त्यांनी डोक्यावरून हात फिरवला तेव्हा हातात अर्धवट कापलेली वेणी आल्याने त्यांनी घाबरून आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकताच पती नदिम घराबाहेर आले. मात्र तिथे कोणीच नव्हते. या प्रकरणी त्यांनीही आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. असाच एक प्रकार १६ आॅगस्टला वडाळ्यात घडला. अनिता शर्मा केस विंचरत असताना त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार आला. त्या झोपून उठल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी त्यांची वेणी कापून टाकली आहे. या घटनांमुळे अफवांचे पीक आले आहे.>अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. घडलेल्या घटनांचा सखोल सुरू असून लवकरच सत्य उजेडात येईल, असे पोलिसांनी सांगितले.>अंधश्रद्धा किंवा विकृतीअंधश्रद्धा, किंवा विकृतीतून या घटना घडत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटना कितपत खºया आहेत याची शहानिशा सुरू आहे.