मुंबई- लोअर परळ आणि करी रोड येथील ना.म. जोशी मार्गावरून करी रोड रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या उड्डाण पूलाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी येथील डांबरी रस्ता खोदण्यात आला असून, हा मार्ग एकदिशा करण्यात आला आहे. परिणामी या रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाहून ना.म. जोशी मार्गावर वाहणारी वाहतूक बंद झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या मार्गावरील फुटपाथची दुर्दशा झाली असून, ठिकठिकाणी फुटपाथ उखडला आहे. त्यात आता या रस्त्याचे काम हाती घेण्यात आल्याने पादचारी वर्गाला नादुरुस्त फुटपाथवरून मार्गक्रमणा करावी लागते आहे. परिणामी नादुरुस्त फुटपाथ आणि खोदाकाम सुरु असलेल्या रस्त्यामुळे पादचारी वर्गाला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.
नादुरुस्त फुटपाथसह खोदकामामुळे पादचारी त्रस्त
By admin | Published: March 07, 2017 2:02 AM