मंगरूळपीर : यंदा मृग नक्षत्रापासूनच वरुणराजा जिल्ह्यातील शेतकर्यांवर कोपला आहे. पेरण्यांचे नक्षत्र म्हणून ओळखल्या जाणारा मृग कोरडाठण्ण गेला. परिणामी पेरण्या रखडल्या. नभांगणात दररोजच ढगांची मांदियाळी झालेले दिसते. मात्र, पावसाचा पत्ता नसतो. काही जाणकारांच्या मते यंदाच्या पावसाळ्यात पाऊस पडण्याजोगे वातावरणच तयार झाले नाही. नेमकी हीच बाब हेरून तालुक्यातील वनोजा येथील शेतकर्यांनी वातावरण निर्मितीसाठी १९ जुलैला मीठ मि२िँं१्रूँं१त पालापोचाळ्याचा धूर अकाशात सोडण्याचा अभिनव प्रयोग केला.तालुक्यात यंदा पावसाची सरासरी फारच कमी आहे. गेल्या वर्षी सर्वाधिक पावसाची नोंद करणार्या तालुक्यात आतापर्यंत ९0.८ मि.मी पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या शेतकर्यांनी पेरण्या केल्या त्या उलटून गेल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. तालुकावासीयांवर रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी धार्मिक कार्यक्रम, धोंडी असे कितीतरी आध्यामिक कार्यक्रम केले आहेत; परंतु वनोजा येथील शेतकर्यांनी अध्यात्माला विज्ञानाची जोड देत नवा प्रयोग केला. त्यासाठी लोकवर्गणी जमा करण्यात आली. १९ जुलैला सकाळपासूनच या प्रयोगाला सुरुवात केली. दिवसभर हिरवा पालापाचोळा जमा करून भट्टीत टाकून जास्तीत जास्त धूर करण्याचा प्रयत्न सुरू होता. दुपारी रिमझिम पाऊस सुरू झाला होता. प्रयोग यशस्वी होत असल्याचे पाहून त्यांच्या आनंदात अधिकच भर पडली. ** गावातील शेतकर्यांनी लोकवर्गणी करून ३५ मिठाचे कट्टे व ५0 लीटर केरोसीन जमा करून दोन ठिकाणी आकाशात धूर करण्याचा प्रयोग केला. यासाठी गाव तलावाजवळील व अकोला मार्गावरील घाट टेक ही दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली. दोन्ही ठिकाणी एका टाकीत हिरवा पालापाचोळा गोळा करण्यात आला. त्यामध्ये मीठ टाकण्यात आले. मीठ मि२िँं१्रूँं१त हा पालापाचोळा पेटवून दिल्या गेला. फवारणीच्या पॉवर स्प्रे पेट्रोल पंपाद्वारे हवा घेऊन धूर तयार केला. या धुरामुळे आकाशात वातावरण निर्मिती होऊन परिसरातील ५ कि.मी अंतराच्या आत पाऊस पडतो, असा त्यांना विश्वास आहे.
नभांगणात सोडला पालापाचोळ्याचा धूर
By admin | Published: July 21, 2014 10:23 PM