शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

DGIPR अधिकाऱ्यांचा इस्त्रायल दौरा कशासाठी?; ‘त्या’ व्हायरल पत्रावर फडणवीस म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 11:04 PM

डीजीआयपीआरमधील अधिकाऱ्यांच्या दौऱ्याबद्दलचं इस्त्रालयच्या मुंबईतील दूतावासाचं पत्र समोर

मुंबई: पेगॅससच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये देशातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. पेगॅसस स्पायवेअर तंत्रज्ञानाचा वापर करून केंद्रीय मंत्री, न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन हॅक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेगॅससचा वापर करून महाराष्ट्रातील नेत्यांचे फोनदेखील हॅक केले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी मोदी सरकारवर केले आहेत. त्यातच मंत्रालयाच्या माहिती आणि जनसंपर्क खात्यातील ५ अधिकारी राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना इस्रायलमध्ये गेल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. याच संदर्भात आता मोठा खुलासा समोर आला असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

डीजीआयपीआरच्या अधिकाऱ्यांचा इस्रायल दौरा माध्यमविषयक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठीच आयोजित करण्यात आल्याचं पत्र व्हायरल झालं आहे. हे पत्र इस्त्रायल दूतावासाचं आहे. सप्टेंबर २०१९मध्ये हा दौरा नियोजित होता. मात्र हा दौरा प्रत्यक्षात नोव्हेंबर २०१९मध्ये झाला. हा दौरा माध्यमविषयक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षण आणि अभ्यासासाठी होता अशी माहिती आता समोर आली आहे. या दौऱ्यासंदर्भातलं इस्त्रालयच्या मुंबईतील दूतावासाकडून तत्कालीन सचिव ब्रिजेश सिंह यांना पाठवण्यात आलेलं पत्र समोर आलं आहे. 

इस्त्रायल दूतावासाकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात डीजीआयपीआरचं शिष्टमंडळ इस्त्रायलमध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे त्याची यादी आहे. त्यात सरकारी जनसंपर्काचे नवीन ट्रेंड्स समजून घेणे, वेब मीडिया वापराचे नवे मार्ग अभ्यासणे, डिजीटल मार्केटिंग, मध्यमांचा वापर, स्मार्ट सिटीमध्ये सरकारी जनसंपर्क यंत्रणेची भूमिका, सायबर क्राईम आणि सायबर सेक्युरिटीसंदर्भात नागरिकांना प्रशिक्षित करणे, ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमांचा वापर करणे अशा विषयांचा समावेश आहे.

फडणवीस यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण“डीजीआयपीआरचा इस्त्रायल दौरा हा मीडियातील बेस्ट प्रॅक्टिसेसच्या अभ्यासासंदर्भात होता. हा दौरा १६ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरू झाला. त्यामुळे तो राज्यात सरकार अस्तित्त्वात नसतानाच्या काळात झाला होता. काल यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राज्यात कृषी विभागातर्फे शेतकर्‍यांचे इस्त्रायल दौरे नेहमी आयोजित केले जातात, तसाच हा दौरा डीजीआयपीआरतर्फे मीडिया बेस्ट प्रॅक्टिसेसच्या अभ्यासासंदर्भात होता, असेच देवेंद्र फडणवीस यांना सांगायचे होते”, असे त्यांच्या कार्यालयासंदर्भात सांगण्यात आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस