शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

१७८ चालकांवर ड्रंक अ‍ँड ड्राइव्ह मोहिमेंतर्गत दंडात्मक कारवाई

By admin | Published: January 01, 2017 9:54 PM

थर्टी फर्स्टची पार्टी करून मद्याच्या नशेत वाहन चालविणाऱ्या १७८ चालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह मोहिमेंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत

पिंपरी-चिंचवड, दि. १ - थर्टी फर्स्टची पार्टी करून मद्याच्या नशेत वाहन चालविणाऱ्या १७८ चालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह मोहिमेंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहराच्या प्रमुख चौकांत, तसेच हॉटेलातून बाहेर पडणाऱ्या मार्गावर वाहतूक पोलिसांनी ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या साह्याने वाहनचालकांची तपासणी केली. त्यात मद्याच्या अमलाखाली अनेक जण आढळून आले. ३१ डिसेंबरच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जणांनी हॉटेल, पब, ढाबे आदी ठिकाणी दारू पिऊन रस्त्यावर वाहने चालवली. मद्याच्या धुंदीत त्यांचे वेगावर नियंत्रण राहत नाही. परिणामी अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात; याला आळा बसावा, याकरिता वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. पिंपरी ३७, चिंचवड ११, निगडी १६, भोसरी १४, चतु:शृंगी १४, सांगवी २० आणि हिंजवडी परिसरात ६६ मद्यपी चालकांवर दंडात्मक कारवाई केली. आयटी परिसर असलेल्या हिंजवडी परिसरात सर्वाधिक ६६ मद्यपींवर कारवाई करण्यात आली आहे, तर चिंचवड परिसरात सर्वांत कमी ११ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहन परवाना न बाळगणाऱ्या, बेकायदा वाहतूक करणाऱ्या ११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.