शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
2
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
3
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
4
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
5
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
6
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
7
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
8
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
9
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
10
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
11
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
12
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
13
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
14
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
16
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
18
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
19
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
20
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले

चेंबूर परिसरात साथीचे आजार

By admin | Published: September 21, 2016 2:43 AM

गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. अशाच प्रकारे चेंबूरमधील अनेक झोपडपट्टी परिसरांत डेंग्यू, मलेरिया आणि कावीळचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. चेंबूरमधील पी.एल. लोखंडे मार्ग, घाटला गाव, कोकण नगर, सिद्धार्थ कॉलनी, महात्मा फुले नगर, सिंधी कॅम्प, लालडोंगर, गुलशन बाग, खारदेव नगर, पी. वाय. थोरात मार्ग, माहुल गाव आणि सिद्धार्थ कॉलनी या विभागांत सध्या मोठ्या प्रमाणात मलेरिया आणि डेंग्यूची साथ पसरली आहे. या परिसरात पावसाळ्यात सतत पाणी साचत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे; तर काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने या ठिकाणी मलेरिया आणि डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळत आहेत. चेंबूरच्या एम पश्चिम विभागात जून ते सप्टेंबरपर्यंत मलेरियाचे ४९ तसेच डेंग्यूचे ३ रुग्ण सापडले आहेत. तर संशयित रुग्णाची संख्या वाढत आहे. सिद्धार्थ कॉलनीतील एकाच घरातील दोन भावांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. या परिसरात मलेरिया रुग्णांची संख्याही मोठी आहे. पालिकेला याबाबत माहिती मिळताच पालिकेने परिसरात धूरफवारणी सुरू केली आहे. मात्र साथीच्या आजारांबाबत पालिकेकडून योग्य उपाययोजना करण्यात येत नसल्यानेच रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप रहिवासी करत आहेत. (प्रतिनिधी)